गावकरी भयभीत :- निंबाळा परिसरात पद्देदार वाघाची दहशत....
वणी :- सुरज चाटे
तालुक्यात वाघ दिसण्याच्या घटना काही नव्या नाही मात्र आता चक्क शहरा जवळील गावा लगतच पट्टेदार वाघाने दर्शन दिल्याने गावालगत वाघाच्या घिरट्या चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे गावकरी, शेतकरी, शेतमजूर ये जा करणारे नागरिक भयभीत झाले आहे.
Tiger sightings in the taluka are not new, but now, with a striped tiger sighted right next to a village near the city, the presence of tigers in the vicinity is becoming a matter of concern. Due to this, villagers, farmers, and agricultural laborers are becoming fearful.
वणी तालुक्यातील निंबाळा गावातील नागरिकांना गावालगतच दि. ०८ ला सकाळच्या दरम्यान पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाळीव जनावरे शेतात चराई करीता घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला शेत शिवारात पट्टेदार वाघ दिसला. वाघ दिसताच त्याने शेतातील बंड्याकडे धूम ठोकली. वाघाचे दर्शन झाल्याने भयभीत झालेल्या या व्यक्तीने ही माहिती नंतर गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी याबाबत शहानिशा करण्याकरिता शेत शिवारकडे मार्गक्रमण केले. गावकऱ्यांनाही या वाघाचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी तात्काळ ही माहिती वन विभागाला दिली. वन अधिकाऱ्यांना वाघ आढळल्याची माहिती मिळताच त्यांनी निंबाळा गावाकडे धाव घेतली. हा पट्टेदार वाघ निंबाळा परिसरातच घिरट्या मारीत असल्याचे दिसत आहे. वाघाच्या हालचालीवर वन विभाग बारीक लक्ष ठेऊन आहे.
वणी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुजाता विरकर, वनरक्षक हे स्वतः वाघ आढळलेल्या ठिकाणी आपल्या चमूसह दाखल झाले. वणी व मारेगाव वन विभागाची संपूर्ण टीम निंबाळा परिसरात तळ ठोकून आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता वन विभागाने वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत. गावकऱ्यांचीही प्रचंड गर्दी वाघ आढळलेल्या ठिकाणी उसळली होती. या वाघाचा कोणतीही अनुचित घटना घडण्या अगोदर बंदोबस्त व्हावा अशी मागणी परिसरात जोर धरत आहे.
0 Comments