वणीकरांकरीता मेजवानी :- तीन अतिथींच्या हास्यरंगाची जुगलबंदी...
वणी :- सुरज चाटे
वणीत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महामूर्ख संमेलनाचे आयोजन धुलीवंदनाच्या दिवशी शुक्रवार दि. १४ ला, शेतकरी मंदिर वणी येथे दु. २.३० वाजता वणीकरांकरिता आयोजन केले असुन अनेक दिग्गज हास्यकवि संमेलनात भाग घेणार आहे.
Like every year in Vani, this year too, the Mahamurkha Sammelan has been organized on the day of Dhuli Vandana on Friday, the 14th, at Shetkari Mandir Vani at 2.30 pm for the people of Vani. Many veteran comedians will participate in the meeting.
हास्यरंगाची बेफाम उधळण करणारा, दरवर्षीच्या नव-नवीन विनोदाने खदखदून हसविणारा, तुफान विनोदी कार्यक्रम. महामूर्ख संमेलनाचे या वर्षी सुद्धा करण्यात आले असुन महिलांकरिता बसण्याची स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण हे तीन अतिथींच्या हास्यरंगाची जुगलबंदी हे असणार आहे. यात नितीन वरणकार हास्यकवी, शेगांव, प्रा. संजय कावरे हास्यकवी, अकोला, गोपाल मापारी गझलकार, अकोला, राजेश महाकुलकर, प्राचार्य हेमंत चौधरी, पुरुषोत्तम गावंडे हे हास्यकवी आपली कला दाखविणार असुन वणीकरांना खदखदून हसविणार आहे.
होणारा कार्यक्रम जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप. सोसा. लि. वणी चे संस्थापक अध्यक्ष संजय खाडे यांचे सौजन्याने होणार असुन, विशेष सहकार्य सौ. किरणताई देरकर यांचे राहणार आहे. तरी होणाऱ्या कार्यक्रमाचा वणीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन, आयोजन समितीचे मुन्नालाल तुगनायत, शशिकांत माळीचकर, जयचंद्रजी खेरा, प्रा. भुमारेड्डी बोदकुरवार, विलन बोदाडकर, गजानन बोढे आदींनी केले आहे.
0 Comments