अँबुलन्स सेवक म्हणुन मिळविली होती ख्याती....
वणी :- राजु गव्हाणे
वणीतील प्रसिद्ध राजे अँबुलन्स सर्व्हिस चे संचालक स्व. सतिशभाऊ बाबुलालजी गेडाम यांचे आजाराने दि. १५ ला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान दुःख निधन झाले.
The late Satishbhau Babulalji Gedam, director of the famous Raje Ambulance Service in Wani, passed away due to illness on the 15th at around 8 am.
मेल्यावर खांदा देण्या पेक्षा जिवंतपणी मदतीचा हाथ द्या ही म्हण मनात घर करून जाते. तोच दृष्टिकोन ठेऊन जगणारे अँब्युलन्स सर्व्हिस देणारे राजे अँबुलन्स सर्व्हिस चे संचालक स्व. सतिशभाऊ बाबुलालजी गेडाम हे काही दिवसापासून आजारी होते. मात्र अखेर दि. १५ मार्च ला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि एक खंबीर होतकरू व गोरगरिबांच्या मदतीला धाऊन जाणारं व्यक्तिमत्त्व हरपल... स्व. सतीशभाऊ गेडाम जगाच्या पडद्या आड निघून गेले.
त्यांच्या पार्थिवावर दिनांक १५ ला दुपारी ५ वाजताच्या दरम्यान गणेशपूर येथील मोक्षधाम येथे अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments