पोलिसांवर हल्ला करुन, जिवे ठार मारल्याप्रकरणी त्या आरोपीस जन्मठेप...
वारंट बजाविण्याकरिता गेलेल्या पोलिसाला केले होते जीवानिशी ठार......
वणी :- सुरज चाटे
आरोपीला वारंट बजाविण्याकरिता गेलेल्या पोलीस पथकाला वारंट बाजाविण्याकरिता अडथळा करून आरोपी अनिल लेतु मेश्राम (41) याने लाकडी दांडक्याने पोलीस राजेंद्र कुळमेथे यांच्या डोक्यावर वार करून त्याला जागीच ठार केले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना प्रकरणाचा निकाल स्पष्ट झाला असुन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश साहेब ए. एम देशमुख यानी दि 21 ला सुनावली आहे. सरकार कडुन सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. रमेश मोरे यांनी बाजु हाताळली. तर तपास अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी काम पाहिले.
The accused Anil Letu Meshram (41) obstructed the police team that went to serve the warrant to the accused and hit policeman Rajendra Kulmethe on the head with a wooden stick, killing him on the spot. While the investigation of this case was going on, the outcome of the case became clear and the accused was sentenced to life imprisonment by Additional Sessions Judge of Pandharkawada, Saheb A. M Deshmukh on the 21st. Assistant Public Prosecutor, Adv. Ramesh More, handled the case. While Police Inspector Dilip Wadgaonkar was the investigating officer.
दि. 26 नोव्हेंबर 2018 रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अनिल लेतु मेश्राम याचेवर गैरजमानती वॉरंटची बजावणी करण्याकरीता राजेंद्र बाजीराव कुळमेथे पो शिपाई मधुकर निळकंठ मुके पोलिस हवालदार व प्रमोद खुपरे पोलिस कॉन्स्टेबल मौजा हिवरी ता. मारेगाव जि. यवतमाळ येथे गेले असता आरोपी हा वॉरंटची बजावणी करण्यास अडथळा निर्माण करून लाखडी दांडक्याने राजेंद्र कुळमेथे याला डोक्यावर वार करुन त्याला जागीच ठार केले व ईतर पोलिस कर्मचा-यावर लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याना जख्मी केले. घटनेचा रिपोर्ट दिल्यावरून पोस्टे. मारेगाव येथे अपराध कमांक ३९९/२०१८ अन्वये गुन्हा नोंद करून तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. फौजदारी प्रकरण सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणामध्ये आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द होऊन आरोपी अनिल लेतु मेश्राम (41), रा. हिवरी, ता. मारेगाव जि. यवतमाळ याला ३०२ भा.दं.वि. मध्ये मनुष्य वध प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा दि 21 रोजी ठोठावण्यात आली, सर्व शिक्षा एकत्र भोगायचे असा आदेश न्यायालयाकडुन पारीत करण्यात आला आहे.
न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला सबळ पुरावा आणि सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. रमेश मोरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून परिक्षण न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व रू १०,००० दंड न भरल्यास दंड न भरल्यास ६ महिन्याचा सश्रम कारावास व इतर गुन्ह्यांतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली. प्रस्तुत प्रकरणाचा तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी तपास केला व पैरवी अधिकारी म्हणुन ए. एस आय दिपक गावंडे यांनी काम पाहिले.
0 Comments