पदाधिकारी कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण...
वणी :- सुरज चाटे
वणी विधानसभा ही महाराष्ट्रात महत्वाची समजली जाते त्यामुळे येथील राजकीय वर्तुळात साऱ्यांचे लक्ष लागले ले असते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच स्पष्ट झाले असुन नजरा ताठ असलेल्या व अटीतटीच्या वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देरकर विजयी झाले. तसेच आता आणखी लोकसभा मतदारसंघाची मोठी जबाबदारी व विश्वास आ संजय देरकर यांच्यावर पक्षाने टाकल्याने संपुर्ण शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
On the orders of Shiv Sena party chief (Uddhav Balasaheb Thackeray), MLA Sanjay Dekar has been appointed as the liaison officer for Chandrapur Lok Sabha constituency.
शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता संपर्कप्रमुखपदी आमदार संजय देरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
0 Comments