उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश :- विक्रांत चचडा व शेकडोंचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश....
वणी :- सुरज चाटे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच स्पष्ट झाले असुन नजरा ताठ असलेल्या वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देरकर विजयी झाले. मात्र काही दिवसातच एक मोठा राजकीय गट शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रिशिर माहिती समोर आली असुन यात माजी आमदार विश्वास नांदेकर व कार्यकर्त्यांसह युवासेना राज्य विस्तारक विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी शिवसेना शिंदे गटात दि 21 ला नागपूर येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. संजय राठोड आदींच्या मुख्य उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने वणीच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आल्याची खमंग चर्चा जोर धरत आहे.
Former MLA Vishwas Nandekar and Yuva Sena state expansionist Vikrant Nandkishore Chachda, along with activists, joined the Shiv Sena Shinde faction on the 21st at a program in Nagpur in the presence of Deputy Chief Minister Eknath Shinde.
विश्वास नांदेकर हे वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार असुन विधानसभा क्षेत्राचा दांडगा अनुभव त्यांना आहे. विक्रांत चचडा यांनी अनेक दिग्गज पदांवर कामे केली असुन माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात अल्पशा कालावधीतच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडन्याचे काम त्यांनी केले आहे. अतिशय कमी वयात राजकारणाशी जुळले, मात्र त्यांच्या वडिलांकडून मिळालेले इमानदार जनसेवेचे धडे हे विक्रांत करिता संजीवनी ठरली.
काही दिवसातच आपल्या आक्रमक स्वभावाने आपल्या भाषेतून अनेकांच्या मनावर राज्य करून बुलंद तोफ म्हणून परिचित असणारे नेहमी गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारे विक्रांत कडे युवासेना राज्य विस्तारक हे पद होते. मात्र आता चक्क माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या सह कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह विक्रांत चचडा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे वणी विधानसभेकरिता या प्रवेशाने राजकारणात खळबळ उडविली आहे. आता वणी विधानसभेकरिता येणाऱ्या निवडणुका चुरशीच्या ठरणार असल्याचे चित्र नाकारता येत नाही.
0 Comments