अपंग विद्यार्थ्यांन सोबत फाल्गुन गोहोकार यांनी केला जन्मदिवस साजरा....
स्नेह भोजना सह स्वेटरचे वाटप...
वणी : - सुरज चाटे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही आगाऊ खर्च न करता अपंग विद्यार्थ्यां सोबत जन्मदिवस साजरा करण्याचा निश्चय घेत विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव करणारे स्वेटर वाटप करीत स्नेहभोजनाचा आनंद घेऊन आगळा वेगळा जन्मदिवस साजरा केला.
On the occasion of the birthday of former taluka president of Maharashtra Navnirman Sena, Falgun Gohokar, they decided to celebrate his birthday with disabled students without any advance expenses. They distributed sweaters to protect them from the cold and enjoyed a luncheon, celebrating his birthday in a different way.
शहारा नजीक असलेल्या वाघदरा भागातील अपंग निवासी शाळेत फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सामाजिक जाणीवेतून आपला वाढदिवस साजरा व्हावा या उद्देशाने फाल्गुन गोहोकार यांनी हा वाढदिवस अपंग विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. या शाळेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करत स्नेहभोजनाची मेजवानी देण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी फाल्गुन गोहोकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोविंदराव थेरे, परशुराम खंडाळकर, गजानन मिलमिले,रमेश पेचे,टोंगे सर, बंडू येसेकर, जितेंद्र शिरभाते,बंडू बोंडे, लोकेश लडके, धीरज पिदुरकर, गुड्डू वैद्य, गितेश वैद्य, शुभम भोयर, प्रशांत तोरे, प्रफुल चुक्कलवार, काशिनाथ कुमरे, सूरज गावंडे, सुमित ताडूरवार, गोवर्धन पिदुरकर, आकाश काकडे, सूरज काकडे, मंगेश येटे, धीरज बगवा, अनिल वासेकर, मिथुन धोटे, कैलास निखाडे, सोमेश्वर ढवस, अमर पाचभाई, राजेश कोल्हेकर, प्रवीण मांडवकर, प्रमोद खुटेमाटे, खगेन्द्र गोहोकार यांच्या सह अपंग शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व फाल्गुन गोहोकार यांचे असंख्य हितचिंतक उपस्थित होते.
0 Comments