ADvt

युवासेनेचे राज्य विस्तारक विक्रांत चचडा शिवसेना शिंदे गटात जाणार....




ठाकरे गटाला धक्का :- माजी आमदारासह एक मोठा गट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार....

वणी :- सुरज चाटे 

     महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच स्पष्ट झाले असुन नजरा ताठ असलेल्या वणी विधानसभेच्या जागी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देरकर विजयी झाले. मात्र काही दिवसातच एक मोठा राजकीय गट शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रिशिर माहिती मिळाली असुन यात असंख्य युवकांसह युवासेना राज्य विस्तारक विक्रांत नंदकिशोर चचडा हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली असल्याने वणीच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आल्याची खमंग चर्चा जोर धरत आहे.

      However, within a few days, there has been confirmed information that a large political group will join the Shinde Sena, including numerous youths, including Yuva Sena state expansionist Vikrant Nandkishore Chachda, along with his office bearers, and there is a lot of talk that a new twist has come to Wani's politics.

    विक्रांत चचडा यांनी अनेक दिग्गज पदांवर कामे केली असुन माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनात अल्पशा कालावधीतच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडन्याचे काम त्यांनी केले आहे. अतिशय कमी वयात राजकारणाशी जुळले, मात्र त्यांच्या वडिलांकडून मिळालेले इमानदार जनसेवेचे धडे हे विक्रांत करिता संजीवनी ठरली. काही दिवसातच आपल्या आक्रमक स्वभावाने आपल्या भाषेतून अनेकांच्या मनावर राज्य करून बुलंद तोफ म्हणून परिचित असणारे नेहमी गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणाऱ्या विक्रांत कडे युवासेना राज्य विस्तारक हे पद होते. मात्र आता चक्क माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह विक्रांत चचडा शिंदे सेनेत प्रवेश करणार अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने वणी विधानसभेकरिता या प्रवेशाने राजकारणात खळबळ माजविली आहे. 


सत्तेच्या लालसेपोटी नाही तर एकनिष्ठे सोबत..विक्रांत चचडा
     सत्ता आली म्हणुन नाही तर मी व माझ्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण पदाधिकारी विश्वास भाऊ नांदेकर यांच्या सोबत नेहमी खांद्याला खांदा लावुन इमानदारीने सोबत आहे मी व माझे कार्यकर्ते पदाधिकारी सत्तेच्या लालसेपोटी नाही तर एकनिष्ठे सोबत आहो असे विक्रांत चचडा यांनी सांगत दि 21 ला देवगिरी बंगल्यावर माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments