ADvt

श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान मल्हारगड कवडशी येथे नवरात्र उत्सव .....



विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन :- आशिष महाराज माणुसमारे यांचे जाहीर कीर्तन...

वणी :- सुरज चाटे 

      वणी तालुक्यातील प्रसिद्ध असे श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान मल्हारगड कवडशी येथे नवरात्र उत्सव 2024 निमित्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यात आज दि 07 ला ह.भ.प. आशिष महाराज माणुसमारे पाचगांव ता. वरोरा जि. चंद्रपुर यांचे जाहीर कीर्तन सुद्धा होणार आहे. 

     सोमवार दि. 02 डिसें. 2024 ला सकाळी 9 मूर्तीचा अभिषेख व विधिवत पुजा, 10 वा घटस्थापना व सत्यनारायण पुजा (दिपक पांडेय, द्विज सांकृत हस्ते) , रात्री 7 वाजता गोंधळाचा कार्यक्रम, मंगळवारी दि 3 ला भजन कार्यक्रम (जय अंबिका माता सांस्कृतिक महिला मंडळ आणि गुरुदेव सेवा भजन मंडळ, नवेगाव, दि 4 ला भजन (जिव्हाळी कष्टकरी महिला भजन मंडळ पुनवट), दि 5 ला भजन कार्यक्रम (अजित खंदारे वणी आणि संच) दि 6 ला डाईका, पुनवट, व भजन (कवडशी भजन मंडळ), दि 07 ला सकाळी 7 वाजता विधिवत महापूजा व सामूहिक आरती, 9 वाजता दिंडी कार्यक्रम, सकाळी 11 ते  2 काल्याचे कीर्तन, नंतर दुपारी 3 ते 4 महाप्रसाद होणार आहे.
     तरी सर्व भाविक भक्त, बंधु-भगिनींनी व व्यापारी बंधुनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments