पक्षशिस्तीचा भंग :- खाडे सह आठ जणांवर निलंबनाची कारवाई ....
वणी :- सुरज चाटे
वणी विधानसभेच्या निवडणुकीत सध्या चांगलाच रंग चढत असल्याने जो तो उमेदवार विजयाची भाषा करीत आहे. मात्र पक्षाच्या शिस्तीच्या विरोधात जाऊन काम केल्याने संजय खाडे यांच्या सह आठ जनावर काँग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून नाना गावंडे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी दि 14 ला केली आहे. तसे वणी येथे पत्रकार परिषद घेत एका प्रसिद्धीपत्रकातून कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक मध्ये वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर (उबाठा) निवडणूक लढवीत असताना देखिल संजय खाडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्यासह त्यांना मदत करत असलेल्या काँग्रेसचे नरेन्द्र केशव ठाकरे (प्रदेश प्रतीनिधी कॉग्रेस), पुरुषोत्तम केशव आवारी (जिल्हा काँग्रेस कमेटी सदस्य), प्रमोद नथ्थुजी वासेकर (माजी तालुका अध्यक्ष कॉग्रेस कमेटी), शंकर राजेश्वर व-हाटे, प्रशांत विजयराव गोहोकार (माजी तालुका अध्यक्ष कॉंग्रेस कमेटी), पलाश तेजराज बोढे (युवा काँग्रेस उपाध्यक्ष), सौ. वंदना पुरुषोत्तम आवारी (प्रदेश सरचिटनीस महीला काँग्रेस महा.) यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याने प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून काँग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षाकरीता त्यांना निलंबीत करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून दि 14 ला वसंत जिनिंग येथे पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले.
यावेळी काँग्रेस चे माजी आमदार वामनराव कासावार, देविदास काळे, डॉ लोढा, टिकाराम कोंगरे, राकेश खुराणा, आशिष खुलसंगे, घनश्याम पावडे, विवेकानंद मांडवकर तथा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments