वणी :- सुरज चाटे
वणी येथील प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी मंदिरात गुरुवार दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजी वैकुंठ चतुर्दशी निमित्त वैकुंठ महोत्सवाचे भव्य व भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
In the famous Shree Ranganath Swamy temple here on Thursday. On the occasion of Vaikunth Chaturdashi on November 14, 2024, grand and grand programs of Vaikunth festival have been organized.
यात सकाळी १० वाजता दांपत्या द्वारा रंगनाथ स्वामींच्या मूर्तीला महा अभिषेक होऊन महोत्सवाचा शुभारंभ, त्यानंतर दुपारी १ ते २ ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज उपासना मंडळ वणी द्वारा सामुहिक उपासना, दुपारी २ ते ४ विजयबाबू चोरडीया द्वारा महाप्रसाद , दुपारी ४ ते ७ ह.भ.प. मनुमहाराज तुगनायत संच द्वारा विष्णुसहस्रनामावली पठन व भक्ती गीतांचा कार्यक्रम, सायं ७ ते ८ यज्ञ सेवा समिती द्वारा सामुहिक श्री सुक्त हवन , रात्री ८ ते ९ धार्मिक देखावे (झांकीया), रात्री ९ ते १२ दीपोत्सव, हरिहर मिलन , ब्रह्मोत्सव छप्पन भोग व महाआरती ने कार्यक्रमाची सांगता होईल.
संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य हिंगनघाट येथील पं.गोविंद महाराज जोशी करणार आहेत. सोबत वाद्यवृंदा सहित दक्षिण भारतातील वेदशास्त्रसंपन्न पंडित असणार आहेत. या कार्यक्रमाला भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे व घरुन छप्पन भोग करिता २५० ग्रॅम मिठाई आणावी तसेच मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments