वचन आठ सोडविणार विकासाची गाठ....
अपक्ष उमेदवार खाडेंचा गांव खेड्यात प्रचाराचा झंझावात...
वणी :- सुरज चाटे
वणी विधानसभेची रणधुमाळी सुरू असुन जो तो आपल्या परीने निवडून येण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करीत आहे. चौरंगी लढतीत एक मात्र अपक्ष उमेदवार बाकीच्यांची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. अपक्ष उमेदवार खाडे यांना विविध स्थराहून मिळणारा पाठिंबा व जन आधार पाहता गेम चेंजर होऊन कोणाचा गेम बिघडविणार हे 23 ला स्पष्ट होणार असुन त्याकरिता विधानसभेत अपक्ष उमेदवार संजय खाडेंची शिट्टी वाजली ...अन विकासाच्या मार्गाने प्रचाराची गाडी सुटली अशीच चर्चा सर्वत्र असुन प्रचाराचा झंझावात गांव खेड्यात पाहायला मिळत आहे.
अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी प्रचाराची शिट्टी वाजवीत आपला वाचननामा जनतेला दिला असुन त्यात शेतकरी, युवक, महिला, माझा शब्द, उद्योग, शिक्षण पायाभुत सुविधा, प्रदुषण मुक्त शहर या आठ वचनावर विकासाची गाठ सोडविण्याकरिता खाडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
1) शेतकरी :- प्रत्येक गावात शेतीच्या विकासासाठी पक्के पांदण रस्ते तयार करणार, पिकाला हमीभाव (कापूसः १२०००/- प्रती विचंटल, सोयाबीन: १००००/- प्रती क्विंटल) मिळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्न करणार शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडित वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा उपलब्ध करून देणार.
2) युवक :-"युवक तिथे व्यायामशाळा" युवकांसाठी प्रत्येक गावात व्यायाम शाळा बांधणार, वणी, झरी व मारेगाव तालुक्यात क्रीडा संकुले सर्व सोयी सुविधांनी अद्यावत करणार, युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
3) महिला :- महिला बचत गटांना स्वयंपूर्ण बनविणार, महिला कौशल्य विकासावर भर देणार, महिला सुरक्षेवर व शिक्षणावर विशेष लक्ष देणार.
4) माझा शब्द :- वेकोली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्य उर्वरित जमिनी संपादित करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, तीनही तालुक्यात MIDC च्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार, कायमस्वरूपी चालतं- फिरतं जनहित केंद्र उभारणार.
5) उद्योग :- मोठा दुग्ध उद्योग उभारुन दुग्ध व्यवसायाला चालना देणार, मोठा कापड उद्योग उभारून कापूस पिकाला भाव मिळवून देणार तसेच नवीन रोजगार निर्मिती करणार, महिला स्वयंरोजगारास चालना देणार, MIDC उद्योग विकासाकडे विशेष लक्ष देणार.
6) शिक्षण :- "गाव तिथे अभ्यासिका", प्रत्येक गावात सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका बनवणार, नियमित करिअर मार्गदर्शन सत्रे राबवणार, आदिवासी व ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करणार.
7) पायाभूत सुविधा :- प्रत्येक गावातील अंतर्गत रस्ते करणार, रस्त्याच्या दोन्ही कडेला भूमीगत, हवाबंद गटारे, गावातील प्रत्येक वार्डात सार्वजनिक शौचालय बांधणार, नियमितपणे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार.
8) प्रदूषण मुक्त शहर :-वणी ला प्रदूषण मुक्त करणार, तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून शहराचे सौंदर्याकरण करणार.
या वचननाम्याची विधानसभेत चांगलीच चर्चा असुन, आठ वचनावर विकासाची गाठ सोडविण्याकरिता संजय खाडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे दिसत आहे.
0 Comments