जरी असेल अपक्ष तरी आहे जनतेचे लक्ष....
अपक्ष उमेदवार संजय खाडे ठरणार गेम चेंजर...
वणी विधानसभेत मत विभाजन होणार :- मुकुटबन येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन....
गोंडवाना संग्राम पक्षाचा संजय खाडे यांना पाठिंबा
वणी :- सुरज चाटे
शुक्रवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या मुकुटबन येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर मुकुटबनमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत मुकुटबन व झरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संपूर्ण मुकुटबन मध्ये शिट्टीच्या आवाजाचा गाजा वाजा दिसुन आला. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे, चंद्रकांत घुगुल यांच्यासह झरी तालुक्यातील समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान काही जनतेने जरी असेल अपक्ष तरी आहे जनतेचे लक्ष असेच काही बोल जनतेतून उमटत होते. अपक्ष उमेदवार गेम चेंजर ठरणार असेच काहिंच्या तोंडून बोल बाहेर पडत आहे.
मुकुटबन येथील रॅलीनंतर प्रचाराचा ताफा प्रचार रुईकोट मार्गे अर्धवन येथे गेले. अर्धवन येथे कॉर्नर सभा झाली. त्यानंतर प्रचार ताफा मार्की येथे गेला. तिथे पदयात्रा निघाली. या पदयात्रेला गाक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रचार ताफा झरी येथे पोहोचला. झरी येथे बिरसा मुंडा चौकात संजय खाडे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी प्रचारात विविध संघटना व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संजय खाडे यांच्या प्रचारात सहभागी झाले. त्यांनी संपूर्ण झरी तालुक्यात कार्यकर्ते पाठिशी राहणार असे वचन दिले.
गोंडवाना संग्राम पक्षाचा संजय खाडे यांना पाठिंबा
गोंडवाना संग्राम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन मसराम यांनी पत्र लिहून संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. धडाडीचे नेते, लोकांच्या समस्येची जाण असलेले लोक विधानसभेला जायला पाहिजे, हा दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यांनी आपला पाठिंबा संजय खाडे यांना जाहीर केला. गोंडवाना संग्राम पार्टीचे नेते बंडू सिडाम यांनी वणीतील प्रचार कार्यालयात सदिच्छा भेट देत पाठिंब्याचे पत्र संजय खाडे यांना सुपुर्द केले. यावेळी बंडू सिडाम यांनी पक्षाचे वणी विधानसभेतील सर्व कार्यकर्ते व नेते संजय खाडे यांचा प्रचार करणार असे वचन दिले.
0 Comments