ADvt

राज्यात महविकास आघाडीची सत्ता बसणार...खा. संजय देशमुख..



संजय देरकर यांची पदयात्रा ठरली लक्षवेधी :- महा विराट रॅलीत  हजारोंची उपस्थिती.....

महाविकास आघाडीच्या स्थानिक अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत निघाली पदयात्रा......

वणी :- सुरज चाटे

     वणी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ दि. १७ ला दुपारी २ वाजता वणी शहरातून निघालेल्या महा विराट पदयात्रेने सर्व मतदारांचे लक्ष वेधले असून विजयाचा शंखनाद वाजला आहे अशी चर्चा वणी विधानसभेत रंगत आहे. राज्यात महविकास आघाडीची सत्ता बसणार आहे. असा आत्मविश्वास यवतमाळ – वाशिम मतदार संघाचे खासदार संजय देशमुख यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे.
     विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आज महाविकास आघाडी शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर रिंगणात असुन विजयाकरिता आगेकूच करीत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ काढलेल्या महा विराट रॅलीत  हजारोंच्या उपस्थितीने वणीकरांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे या निवडणुकीत मशालीचा विजय मतदारांनी निच्छित केला आहे असे दिसून येत होते.
     जत्रा मैदानातून निघालेल्या या रॅलीला माजी आमदार वामनराव कासावार यांनी संबोधिले तसेच उमेदवार संजय देरकर यांनी मतदारांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. रॅलीत वणी विधानसभा क्षेत्रातून हजारो कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments