त्या बेजबाबदार वक्तव्याचे वणीत पडसाद...
वणी कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर एसोसिएशन तर्फे तीव्र निषेध...
वणी :- सुरज चाटे
व्यापारी हा देशाचा कना असुन त्याच व्यापाऱ्याबद्दल शिवसेना उबाठा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा वणी कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर एसोसिएशन तर्फे तीव्र निषेध करण्यात आला.
Vani Consumer Product Distributors Association strongly condemned Shiv Sena Ubhata spokesperson Sanjay Raut's irresponsible statement about traders being the backbone of the country.
आपल्या प्रामाणिक व्यापारी बांधवांबद्दल शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ता संजय राऊत यांनी केलेली बेजबाबदार विधाने व्यापारी बांधवाच्या काळजाला घाव घालनारी आहेत. हेच प्रामाणिक, कष्टाळू व्यापारी, ज्यांनी कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता ग्राहकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य केले, आज त्यांच्याबद्दल असा अपमानास्पद उल्लेख होणे अत्यंत लज्जास्पद आहे. हे व्यापारी GST तसेच अन्य विविध प्रकारचे कर शासनाच्या खजिन्यात भरून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. वणी कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर एसोसिएशन तर्फे अशा प्रकारच्या विधान करणाऱ्या संजय राऊत चा आम्ही संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करतो असे असोसिएशनचे अध्यक्ष लवलेश लाल, सचिव भरत जोबनपुत्रा यांनी कळविले आहे.
0 Comments