ADvt

25 वर्षाच्या जनसंपर्का नंतर वणी विधानसभेचा गड काबीज करण्यात देरकर यशस्वी....



20 वर्षानंतर भगवा फडकला :- बोदकुरवार यांना मात देत संजय देरकरांचा दणदणीत विजय...

वणी :- सुरज चाटे

      महाराष्ट्र विधानसभा करिता दि 20 ला मतदान पार पडले. त्याचे निकाल दि 23 ला जाहीर झाले असुन आपल्या राजकारणाचे पंचवीस वर्ष कधी पक्षाकडून तर कधी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली मात्र त्यात अपयश पदरी पडले. सदैव जनसंपर्कात राहुन संजय देरकर यांनी अखेर वणी विधानसभा काबीज केली असुन भाजपा चे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना मात देत दणदणीत विजय मिळविला आहे. वीस वर्षा नंतर विधानसभेत भगवा फडकल्याने कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
     Always in touch with the public, Sanjay Dekar has finally captured the Vani assembly seat and has won a resounding victory by defeating BJP's Sanjeev Reddy Bodkurwar. After twenty years, the saffron flag has been raised in the assembly, creating an atmosphere of jubilation among the workers.
      मतदान पार पडल्यानंतर सर्व उमेदवारांची धाकधुक वाढली होती. स्पर्धेतील उमेदवार गुलाल तर आपलाच असे बोलत होते. मात्र जनमानसात कोणाच्या विजयाचा गुलाल उधळणार असे असताना अनेक आवाहन देत गेली 25 वर्ष सतत 1999, 2009, 2014, 2019 पराजयाचा सामना होऊन सुद्धा जनसेवेत संपर्कात असलेल्या संजय निळकंठराव देरकर शिवसेना (उबाठा) यांनी 94618 मते घेत अखेर वणी विधानसभेवर भगवा फडकविला असुन भाजपा चे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना 15560 मताधिक्याने पराभव करीत दणदणीत विजय मिळविला आहे. विजयी उमेदवाराची कार्यकर्त्यांकडून विजयी मिरवणुक  जल्लोषात काढण्यात आली.
     12 उमेदवार रिंगणात होते यात अरुणकुमार रामदास खैरे (बसपा) 1163, राजू मधुकरराव उंबरकर (मनसे) 21977, संजय निळकंठ देरकर (शिवसेना उबाठा) 94618, संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार (भाजप) 79058, अनिल घनश्याम हेपट (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) 3875, प्रवीण रामाजी आत्राम (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी) 2532, राजेंद्र कवडुजी निमसटकर (वंचित बहुजन आघाडी) 3605, संजय रामचंद्र खाडे 7540, केतन नत्थुजी पारखी 407, नारायण शाहु गोडे 855, हरिष दिगांबर पाते 1307, निखिल धर्मा ढुरके 2246 असे मते मिळाली. तर पोस्टल बलेट 228 मते बाद झाली आणि 1328 नोटा ला मिळाले. 
       मतमोजणीसाठी 14 टेबल, 25 राउंड मध्ये मतमोजनी पार पडली. मतमोजणी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. तसेच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मौलिक सहकार्य केले. 

Post a Comment

0 Comments