वणीत उध्दव ठाकरे कडाडले :- बॅग तापसणीवरही घेतला समाचार...
वणी :- सुरज चाटे
मविआचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची दि 11 ला वणीत जाहीर सभा झाली. दरम्यान विरोधकांवर उद्धव ठाकरे चांगलेच कडाडले असुन, आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी अनेकांचा समाचार घेतला. 20 तारखेला कुणालाही डोळ्यावर पट्टी बांधू देऊ नका असे त्यांनी आपल्या भाषणातून आवाहन केले. त्यांच्या सभेकरिता अलोट गर्दी शासकीय मैदानावर जमली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यावर होते. वणी येथील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात जाहीर सभा पार पडली. दरम्यान उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चांगलेच ताशेरे ओढले. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.
दरम्यान यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा माझ्या बॅगची तपासणी झाली, तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा कारण हा आपला अधिकार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी.....
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांना सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे वणी येथे सभा झाली. सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या. त्यावर ठाकरे म्हणाले की, मोदी आणि शाहांची बॅग तपासली का? एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासायला हवी की नको?, असा सवाल करत टोलाही लगावला.
तपासणी दरम्यान ठाकरेंची अशीही माणुसकी....
जेव्हा उद्धव ठाकरे वणी येथे हेलिकॉप्टर ने हेलिपॅड वर उतरले असता त्यांच्या बॅगची निवडणुक अधिकाऱ्यांकडून तपासणी झाली दरम्यान ठाकरेंनी काही पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण तहान लागली असेल तुम्ही सुद्धा माणसं आहात अशी माणुसकीही उद्धव ठाकरेंनी दाखविली.
0 Comments