ADvt

सावधान वणीकर.... बनावटी विक्रीपत्राच्या आधारावर होतोय फेरफार ...



सावधान वणीकर....

बनावटी विक्रीपत्राच्या आधारावर होतोय फेरफार ...

यावर वचक कुणाची?... :- तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार...

वणी :- सुरज चाटे

     तालुक्यात सध्या दलालांचे जाळे सर्वत्र पसरले असुन सदर दलाल चक्क बनावटी विक्रीच्या आधारे तलाठी कार्यालयात विक्री सादर करून त्या आधारावर बनावटी विक्रीत नमुद असलेल्या व्यक्तींच्या नावावर सदर सातबारा व फेरफार घेतल्या जात असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असुन यामुळे ज्यांनी पैसे देऊन विक्री करून घेतली अशांची मात्र चांगलीच फसगत होत आहे.
     दिवसागणिक आपल्या हक्काची एखादी जागा, घर किंवा, शेती असावी असं कुणाला न वाटावं हे शक्य नाही. त्यामुळे आपल्या मेहनतीचा पैसा प्लॉट, घर, किंवा शेती विकत घेण्याकरिता लावतो मात्र जर त्याला माहिती पडले की झालेल्या व्यवहारात तो फसला असावा मग त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. असेच काहीसे प्रकार सध्या वणी परिसरात उघडकीस येत असुन एखाद्या व्यक्तीची विक्री नसुन सुद्धा त्याच्या नावावर प्लॉट व फेरफार सात बारा होत असल्याचे प्रकार निदर्शनात येत आहे. मग अशा बनवटी कागदपत्रांच्या आधारे फेरफार सातबारा होतात तरी कसे? असा सवाल उपस्थित होत असुन यामध्ये संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांचा देखील हातमिळवणी असल्याचे नाकारता येत नाही मग भल्या माणसाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
    मात्र शासकीय माहितीत अनियमित हस्तक्षेप करून शासकीय रेकॉर्डस् वर चुकीच्या नोंदी करण्याचे अधिकार यांना कुणी दिले? मग त्या दलालांशी यांची हातमिळवणी तर नाही ना? असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत असुन संबंधित व्यक्ती मालक नसताना नावावर मालमत्ता करून दुसऱ्या पक्षाला नोंदणीकृत दस्ताद्वारे विक्री होत असल्याचे प्रकार वणी उपविभागात जोर धरत असल्याने यांवर मग वचक कुणाची?असा ज्वलंत प्रश्न उपस्थित होत आहे.

खरेदी विक्री उपनिबंधक व तलाठी कार्यालयात दलालांचा मुक्त संचार.....
शासकीय कागदपत्र व रेकॉर्डस् नियमानुसार गोपनीय असले पाहिजे मात्र तसे न होता दुय्यम निबंधक, व तलाठी कार्यालय वणी येथे तोतया दलालांचा मुक्त संचार दिसत असुन यांची धाव थेट शासकीय दस्तापर्यंत असुन सर्वसामान्यांची यातुन फसवणूक होत आहे मग हे अधिकारी या दालालानसोबत हातमिळवणी करून हा सगळा प्रकार करतेय की काय? असा प्रश्न उपस्थित होत असुन अशांवर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments