ADvt

विक्रांत नंदकिशोर चचडा यांची युवा सेनेच्या विस्तारक पदी नियुक्ती....अन जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


तुम जिओ हजारो साल .... साल के दिन हो पचास हजार

💐🎉💐 *शुभेच्छुक :-  विक्रांत चचडा मित्र परिवार तथा वणी विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते*.

वणी :- सुरज चाटे

     संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अत्यंत जोमाने जनतेचे प्रश्न निस्वार्थ हेतूने समाजकारणाचा एकमेव हेतू ठेऊन सोडवीत असतात असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे विक्रांत नंदकिशोर चचडा यांची शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे या नियुक्त्या जाहीर झाल्याने वणीचा विक्रांत आता राज्याच्या राजकारणात पोहोचला आहे विक्रांत चचडा यांना अमरावती जिल्हा विस्तारक पदाची धुरा पक्षश्रेष्ठींनी दिल्याने कार्यकर्ते व युवा पदाधिकारी यांच्यात उत्साह असून सदर नियुक्तीने त्यांच्यात नवऊर्जा निर्माण झाली असल्याचेच दिसत आहे. तसेच आज जन्मदिनानिमित्य शुभेच्छा चा देखील वर्षाव होत आहे.

   वंदनीय शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे लाडके मा मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे, युवासेना सचिव वरुण ची सरदेसाई साहेब, सुप्रदा ताई फत्तेर्फेकर युवासेना कार्यकर्णी सदास्य, रुपेश दादा कदम, योगेश दादा निमसे, हर्षल दादा काकडे यांच्या मार्गदर्शनात वडीलांना आवडत असलेले जनसेवेचे पाऊल त्यांच्याच पावलावर पाउल अतिशय कमी वयात राजकारणाशी जुळले, मात्र त्यांच्या वडिलांकडून मिळालेले इमानदार जनसेवेचे धडे हे विक्रांत करिता संजीवनी ठरली.

     अखेर सच्चा कार्यकर्त्यांची पक्षाला सुद्धा जाणीव आहेच, त्याचाच विचार करीत युवासेनेच उगवत नेतृत्व अमरावती जिल्हा विस्तारक पदाची कमान विक्रांत नंदकिशोर चचडा यांच्या हातात देऊन युवासेनेचे कार्य प्रत्येक पातळीवर महाराष्ट्रभर अतुलनीय आहेच, मात्र आता अजून जोमाने कार्य करून कार्यकर्त्यांना संजीवनी देण्यात नवे युवासेना विस्तारक विक्रांत चचडा किती खरे ठरणार? हे त्यांच्या कार्यप्रणालीवरच अवलंबून असून, सध्या स्थितीत मात्र कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच त्यांचा दि 09 ला जन्मदिवस असल्याने शुभेच्छा चा देखिल वर्षाव होत आहे.


     युवासेनेच उगवत नेतृत्व म्हणजे विक्रांत नंदकिशोर चचडा...

    युवासेनेचे कार्य प्रत्येक पातळीवर महाराष्ट्रभर अतुलनीय असून त्यातुन अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य युवासेने मार्फत पदाधिकारी व कार्यकर्ते करीत असतात अशाच कार्याची दखल घेत आपल्या जनतेला कोणताही त्रास व कोणी वरचढ होऊ नये हा एकमात्र दृष्टिकोन ठेऊन रीतसर लढणारे काही दिवसातच आपल्या आक्रमक स्वभावाने आपल्या भाषेतून अनेकांच्या मनावर राज्य करून बुलंद तोफ म्हणून परिचित असणारे नेहमी गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारे व वेळप्रसंगी आर्थिक मदतीचा हाथ देखील समोर करणारे असे एकमात्र नेतृत्व म्हणजे युवासेनेचे विस्तारक तथा एन एच फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विक्रांत नंदकिशोरजी चचडा या जनसेवकाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.......

Post a Comment

0 Comments