ADvt

भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन ...



भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन ...

स्त्रीरोग, हृदयरोग व मधुमेह, अस्थिरोग, बालरोग, जनरल फिजिशियन, नेत्ररोग, सर्जरी, दंतरोग, कान, नाक व घसा मोफत तपासणी....

मोठ्या प्रमाणात रुग्णांनी लाभ घेण्याचे काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य तथा शिबिराचे संयोजक डॉ. महेंद्र लोढा यांचे आयोजन ..

वणी :- सुरज चाटे

      गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी दु. 1 ते 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे. या महाआरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, रोग निदान, ईसीजी, रक्त तपासणी, बीएमडी तपासणी केली जाणार आहे. रुग्णांना मोफत प्राथमिक औषधी वितरण केले जाणार आहे. खा. प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात हे शिबिर होत आहे. या शिबिराचा झरी तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य व शिबिराचे संयोजक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे. 
     On Monday, September 9, The camp will be held from 1 to 5. Free health check-up, disease diagnosis, ECG, blood test, BMD check-up will be done in this Maha Arogy camp. Free primary medicines will be distributed to the patients. eat The camp is being held under the guidance of Pratibha Dhanorkar and former MLA Vamanrao Kasawar. More and more patients of Zari taluka should take advantage of this camp, says Congress State Committee member and organizer of the camp. It has been done by Mahendra Lodha.
    सदर आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञ रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. 
    शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसचे झरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. शिबिराला तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वणी विधानसभा क्षेत्र काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

!!!!  मारेगाव व वणी येथेही शिबिर!!!! 
शनिवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी लोढा हॉस्पिटल मारेगाव तर 15 सप्टेंबर रोजी वणी येथे   महाआरोग्य शिबिर होणार आहे. मुकुटबन व मारेगाव येथील शिबिरात ज्या रुग्णांना गंभीर आजाराचे निदान होणार आहेत. त्या रुग्णांवर वणी येथे दि. 15 सप्टेंबर रोजी होणा-या सुपरस्पेशालिटी शिबिरात उपचार केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments