संजय खाडे यांच चालत फिरत जनहित केंद्र पोहोचलं रंगनाथ नगरात...
300 च्या वर आयुष्यमान कार्डसह ई-श्रम नोंदणी :- गोरगरीब मजुर वर्गाशी साधला संवाद..
वणी :- सुरज चाटे
दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त बाळूभाऊंनी चालवलेल्या लोककल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस जिल्हा सरचिटणीस तथा कापुस पणन महासंघ (महाराष्ट्र राज्य) संचालक संजय रामचंद्र खाडे यांनी दि ४ जुलै २०२४ रोजी चालतं-फिरतं जनहित केंद्र या मोहिमेला सुरवात केली आणि बघता बघता अखे वणी विधानसभा क्षेत्र हे चालते फिरते जनहित कार्यालय पिंजून काढत आहे. यात जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण केल्या जात असुन त्यांना निर्माण होत असलेल्या समस्या व नवनवीन योजनांची माहिती व लाभ सुद्धा या केंद्रामार्फत जनतेला होत असुन दि 26 सप्टेंबर ला हे चालत फिरत केंद्र वणीतील रंगनाथ नगर येथे दाखल होत त्यांना आयुष्यमान कार्डसह ई श्रम कार्ड विषयी व लाडकी बहीण योजने विषयी माहिती देत 300 च्या वर जनतेनी याचा लाभ घेत आप आपल्या विविध समस्या सोडवुन घेतल्या. यावेळी संजय खाडे यांनी जनतेशी संवाद साधला.
On the occasion of the birth anniversary of late MP Balubhau Dhanorkar, keeping in view the ideal of public welfare run by Balubhau, Congress District General Secretary and Director of Cotton Marketing Federation (Maharashtra State) Sanjay Ramchandra Khade started the Walk-Fire-Tan Janhit Kendra campaign on 4th July 2024 and soon Akhe Vani Assembly Constituency The Public Interest Office is busy. Various problems of the people are being solved and the people are getting information and benefits of the problems and new schemes they are facing through this center. More than 300 people took advantage of it by giving information about it and solved their various problems. On this occasion, Sanjay Khade interacted with the public.
संजय खाडे यांनी जनहित केंद्राच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकरी, मोलमजुर, महिला, युवा व दिव्यांग यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुलभ आणि सुकर करणे हा प्रामाणिक हेतू मनात ठेऊन ही मोहीम संजय खाडे यांनी हाती घेतली आहे. दरम्यान याद्वारे आज तागायत वणी विधानसभा क्षेत्राच्या कानाकोपऱ्यात हजारो लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात संजय खाडे यांच्या जनहित केंद्राला मोठे यश मिळत असुन जनतेचा आशीर्वाद सुद्धा त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसत आहे. यावेळी जनतेला त्यांनी काम तुमचं जनहित केंद्र आमचं असे सुद्धा बोलून दाखविले.
दरम्यान त्यांची जनहित केंद्राची संपूर्ण टीम यात सहभागी होती. यावेळी संजय खाडे, वराटे, तेजराज बोढे, जयसिंगराव गोहोकार यांनी रंगनाथ नगर येथे भेट देत जनतेशी संवाद साधला.
0 Comments