ADvt



यवतमाळ :- सुरज चाटे 

  यवतमाळ जिल्ह्यातील, मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील 17 वर्षीय विद्यार्थिनीने चंद्रपूर येथील वसतीगृहात गळफास घेत जगाचा निरोप घेतल्याची खळबळजनक घटना बुधवारला संध्याकाळच्या दरम्यान उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.  
     A sensational incident of a 17-year-old student from Gondburanda in Maregaon taluka of Yavatmal district came to light on Wednesday evening after hanging herself in her hostel in Chandrapur.
      आई-बाबा मला माफ करा, मला अभ्यासाचे खूप टेन्शन आले आहे, असा व्हिडीओ बनवून तिने गळफास घेतल्याची माहिती असुन आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 
      प्रांजली यशवंत राजूरकर (१८, रा. गोंड बुरांडा ता. मारेगाव, जिल्हा. यवतमाळ) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. मंगळवारी रात्री प्रांजलीची तब्येत बरी नाही असे आपल्या मैत्रिणीला सांगून रूममध्ये गेली. मात्र सकाळ झाली तरीही ती बाहेर आली नाही. त्यामुळे मुलींनी होस्टेलमधील कर्मचाऱ्यांना सांगितले, त्यांनी पाहणी केली असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. 
     चंद्रपूर येथे शवविच्छेदनानंतर मृतदेहावर गोंडबुरांडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. प्रांजली हिच्या यया टोकाच्या पावलाने परिवारावर दुःखाचा डोंगर ओढावला आहे. तिच्या पश्चात आई वडील व एक लहान भाऊ असा आप्त परिवार असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments