ADvt

कार्यकर्ता हा कार्यकरताच राहणार....नेता मात्र आमचा गब्बर...अनेकांच्या मुंबई वाऱ्या...



मुंबई - दिल्लीतील राजकारणात गल्लीतील कार्यकर्ता मात्र अस्वस्थ.....

व्यथा कार्यकर्त्यांची

वणी :- सुरज चाटे

     निवडणूक कोणतीही असो कार्यकर्त्यांची मुख्य भूमिका असते. कार्यकर्ते ही एक माळ असते जर ती तुटली की त्याचे मणी हे सैरा वैरा सांडत असते. निवडणुकीदरम्यान सर्वात महत्वपूर्ण भूमिका जर कुणाची असते तर ती म्हणजे कार्यकर्ता. आणि कार्यकर्ता फक्त निवडणुकीच्याच वेळेस जर लक्षात येत असेल तर तो नेता युज अँड थ्रो वाला असे लक्षात येते. बहुतांश तरुण मंडळी या नादात जास्त जात आपला राजकारणात प्रवेश होऊन आपण उच्च पदावर गेलो पाहिजे अशी इच्छाशक्ती निर्माण करीत गल्ली ते दिल्ली पर्यंतचा प्रवास गाठावा असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते. मात्र त्या नेत्याच्या किंवा पदाधिकाऱ्याच्या मनात काय चाललंय हे मात्र कळायला मार्ग नसतो. त्याला आपल्या कार्यकर्त्याचे वर्चस्व नकोसे असते. कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी किंवा नेता हा मात्र गब्बरच दिसुन येत असतो मग कार्यकर्त्याने त्याच्या मागे पुढे आपल्या चकरा मारण्यातच आयुष्य घालवायचे काय? असा सवाल प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनातील उद्भवणारा हा एक ज्वलंत प्रश्न आहे. त्यामुळे मुंबई दिल्लीतील राजकारणात आपल्या गल्लीतील कार्यकर्ता मात्र अस्वस्थ असल्याचे दिसत आहे.
     Whatever the election, activists have a key role to play. Activists are a necklace, if it is broken, its beads are shedding hatred. If anyone plays the most important role during elections, it is the worker. And if the worker is noticed only at the time of election, then he is noticed as a use and throw leader. Every activist wants to reach the journey from the streets to Delhi, creating the desire that most of the youth should join politics and rise to higher positions. But there is no way to know what is going on in the mind of that leader or official. He does not want to be dominated by his worker. The office bearer or leader of any party is seen as a fool, so why should the worker spend his life following him? Such a question is a burning question that arises in the mind of every worker. Therefore, it seems that the workers in our street are uncomfortable in the politics of Mumbai Delhi.
 
     महाराष्ट्राच्या राजकारणाचे सद्या तीन तेरा झाले असुन कोणी कुठं तर कोणी कुठं.. अशी परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्या समोर विधानसभेचा बिगुल वाजणार असून अनेक नवे चेहरे रांगेत उभे आहे. मुंबई - दिल्ली चे राजकारण.... मात्र त्रास हा गल्लीतील राजकारणात होत असतो कधी या पक्षातून त्या पक्षात तर कधी त्या पक्षातून या पक्षात बेडकासारखे उड्या मारणारे राजकीय मंडळी मात्र अशा स्थितीत तटस्थ असलेल्या कार्यकर्त्यांनी काय करावे?...कोणाच्या नावाचा झेंडा हाती घ्यावा? असा सवाल कार्यकर्त्यांच्या मनात असुन कधी कुणाला कसा पाठिंबा द्यावा?.... दिल मे कुछ और.... आपल्या नेत्यांची भूमिका ही काही वेगळीच, मग अशा परिस्थितीत सच्चा कार्यकर्ता भरकटला जात आहे. जो तो आप आपल्या परीने राजकारणाचे धागे विणताना दिसत आहे. साहेबांशी योग्य वागल्याने साहेब आपल्याला मदत करतील अशी कार्यकर्त्यांची आशा असतेच मात्र वेळ आला की, साहेब मात्र सच्चा कार्यकर्त्याला .... डावलून मर्जीचा उमेदवार रिंगणात देऊन धनशक्तीवानाला समोर करत असते, कारण सच्चा कार्यकर्ता हा शक्तीवान तर असतो मात्र धनशक्तीवान नसतो त्यामुळे साहेबाना धनशक्ती शिवाय जमतच नसते अशा या राजकीय दलदलीतून सच्चा कार्यकर्ता आउट होत असतो.
     कोणत्याही पक्षातील राजकीय मंडळी हा कार्यकर्त्या शिवाय अपूर्ण आहे. याची जाणीव जर त्या राजकीय पदाधिकारी व नेत्याला नाही तर मग तो राजकारणात आपली प्रगती करू शकत नाही. कारण एखादी पक्ष तळागळात पोहोचविण्याचे काम जर कुणी करत असेल तर तो फक्त कार्यकरताच करू शकतो. कार्यकर्त्यांची व जनतेची तशी नाळ जुडलेली असते त्यामुळे कार्यकर्त्यांशीवाय राजकारण व नेते व पदाधिकारी मंडळी सुद्धा ऐरणीवर आहे. सर्व लहान सहान नेत्यांच्या कप बश्या धुन, सतरंज्या उचलुन मात्र कार्यकर्ता हा तितेच असतो आन नेता व राजकीय पदाधिकारी मात्र गब्बरच होताना दिसते....मग मेहनत करे मुर्गा अंडा खाये फकीर.....असा हा सच्चा कार्यकर्ता मुंबई - दिल्लीतील राजकारणात गल्लीतील कार्यकर्ता मात्र अस्वस्थ दिसतो.

सुरज रमेश चाटे, वणी
मो न 9518585970

टिप :- या लेखातून कार्यकर्त्यांच्या मनातील विचार मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला असुन कोणाचेही मन दुखविण्याचा आमचा हेतु नाही. 

Post a Comment

0 Comments