ADvt

आरसीसीपीएल ला दुसऱ्यांदा फाइव स्टार रेटिंग अवार्ड....



देशात आरसीसीपीएल नी रोवला मनाचा तुरा :- उत्कृष्ठ व्यवस्थापनाची दिली पावती...

वणी : - सुरज चाटे

    भारतीय खाण मंत्रालय, भारत सरकारच्या खाण मंत्रालयातर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्टार रेटिंग पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. हा सोहळा किशन रेड्डी, कोळसा आणि खाण मंत्री, भारत सरकार यांच्या उपस्थितीत पार पडला.

     या सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील खाणींना शिल्ड व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन लाइमस्टोन माईन्स मेसर्स आरसीसीपीएल प्रायव्हेट लि. खाण क्षेत्रात सातत्याने प्रगतीशील, नाविन्यपूर्ण कार्य केल्याबद्दल 2022- 2023 या वर्षासाठी सलग दुसऱ्यांदा फाइव्ह स्टार रँकिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेत देशातील अनेक बड्या खनिज संस्था सहभागी झाल्या होत्या.
   दरम्यान कोळसा आणि खान मंत्री किशन रेड्डी यांच्या हस्ते पंचतारांकित खाणींना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी किशन रेड्डी यांचा सन्मान करण्यात आला. 
     या मालिकेत, RCCL प्रायव्हेट लिमिटेड संचालित मुकुटबन लाइम स्टोन माईन्सला एकुण पाच तारे देण्यात आले. युनिट हेड जयंत कंदपाल आणि खाण विभाग प्रमुख कृष्णकुमार राठोड यांच्या सक्षम नेतृत्वाखाली RCCPL ला दुसऱ्यांदा पंचतारांकित मानांकन मिळाले आहे. याबाबत माहिती देताना मुकुटबन चुनखडी खाणीचे खाण व्यवस्थापक कृष्णकुमार राठोड म्हणाले की, ही खाण पद्धतशीर व शास्त्रीय पद्धतीने चालविली जाते.

Post a Comment

0 Comments