ADvt

हाती घोडा पाल की....जय कन्हैय्या लाल की च्या गजराने दुमदुमली वणी नगरी...



हाथी घोडा पाल की....जय कन्हैय्या लाल की च्या गजराने दुमदुमली वणी नगरी...

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शोभे यात्रेने वेधले  वणी करांचे लक्ष...

वणी  :- सुरज चाटे

     श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा वणी  शहरात सात दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीने सात दिवस विविध धार्मिक सामाजिक मनोरंजनात्मक कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केले होते .या सात दिवशीय कार्यक्रमाचा लाभ वणीकरानी  मोठ्या प्रमाणात घेतला .शेवटच्या दिवशी 27 ऑगस्टला वणी   शहरात भव्य शोभ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
     Shri Krishna Janmashtami celebrations were celebrated with great enthusiasm for seven days in the city of Vani. Shrikrishna Janmashtami committee organized various religious social entertainment family programs for seven days. Vanikara benefited greatly from these seven days program. On the last day on August 27, a grand procession was organized in Vani city.


      या शोभा यात्रेत टाळ मृदुंग घेऊन वारकरी भजन , नयन रम्य देखावे, आकर्षक रोशनाई, आदिवासी संस्कृती जपणारे गोंडी ढेमसा नृत्य, शिव तांडव, नृत्य मनमोहक गरबा नृत्य, छत्रपती ढोल ताशा पथक, कोलकत्ता येथील महाकाली, भव्य बजरंग बली, यासह भव्य मनमोहक देखावे शोभा यात्रेत सहभागी झाले होते. सायंकाळी सहा वाजता अमृत भवन  मंदिरातून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. शोभा यात्रेत बगी मध्ये श्रीकृष्ण, राधाकृष्ण, शिवपार्वती, विष्णू लक्ष्मी ,यासह विविध वेशभूषा परिधान करून बग्गी मध्ये बालगोपाल सहभागी झाले होते ही शोभायात्रा अमृत भवन ते इंदिरा गांधी चौक, खाती चौक, गांधी चौक, कमांन चौक, टागोर चौक ,महाराष्ट्र बँक चौक ,डॉ  बाबासाहेब आंबेडकर चौक, टिळक चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,अशी फिरून शोभायात्रेचा  समारोप करण्यात आला.
      या शोभा यात्रेत यावर्षी मनमोहक विविध देखाव्यांनी वणी करांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शोभा यात्रेत माजी खासदार ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, संजय देरकर, विजय पिदुरकर, दिनकर पावडे,  पवन एकरे, सत्यजित ठाकूरवार यासह गावातील गणमान्य नागरिक हजारो महिला पुरुष भाविक भक्तगण हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की चा जयघोष करीत शोभायात्रेत सहभागी झाले होते. 
     श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सल्लागार विजय बाबू चोरडिया,सौ सीमा विजय चोरडिया समितीचे अध्यक्ष ऍड कुणाल चोरडिया सौ ख्याती कुणाल चोरडिया यांनी शोभायात्रेत सहभागी बालगोपालसह भक्तांची काळजी घेतली संपूर्ण वणी  शहरात शोभायात्रा  निमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शोभा यात्रेच्या बंदोबस्तासाठी वणी  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेराणी यांच्यासह त्यांच्या चमूने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments