ADvt

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कु.अवंतिका पुंड्रावार ने पटकावले सुवर्ण पदक...



राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कु.अवंतिका पुंड्रावार ने पटकावले सुवर्ण पदक...

गावच्या अवंतिकाची दिल्लीत भरारी..
 
  वणी :- सुरज चाटे
     महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धा नुकतीच बारामती येथे पार पडली. अत्यंत वेगवान अवघड समजल्या जाणाऱ्या कराटे सारखे स्पर्धेत अवंतिका पुंड्रावार ९ वर्षा वयोगटात कुमिते व काता मध्ये दोन सुवर्ण पदक मिळवत तालुक्याचा व पाटण गावाचा  नावलौकीक वाढविला आहे.
    Maharashtra state level karate competition was recently held at Baramati. Avantika Pundrawar has won two gold medals in kumite and kata in the 9 years age group in a competition like karate which is considered to be very fast and difficult.
     गरीब परिस्थिती आणि त्यावर मात करीत ९ वर्षीय  अवंतिकाला तिच्या पालकांनी गेल्या दोन वर्षांभरापासून कराटे प्रशिक्षण ध्यायला सुरुवात केली आर्मी वॉरियर्स मार्शल आर्ट अँड फिटनेस क्लब पाटण येथे  ती प्रशिक्षण घेत होती. तिच्या यशात प्रशिक्षक जितु साकपेल्लीवार व अरविंद चुक्कलवार व वडील विलास पुंड्रावार आई सुप्रिया विलास पुंड्रावार, आजोबा गंगाराम, आजी रेणुका यांचे योगदान लाभले आहे. 
     अवंतिका हिने दोन सुवर्ण पदक पटकावले आहे तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आई वडील यांच्या प्रोत्साहनामुळे तिने कराटे स्पर्धेमधे  दोन सुवर्ण पदक मिळविले आहे . व तिची राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दिल्ली येथे निवड झाली आहे त्यामुळे आता झरी तालुक्यातील पाटण च्या अवंतिकाने दिल्लीत भरारी घेतली आहे. 

Post a Comment

0 Comments