रेल्वे अपघातात 20 वर्षीय युवकाचा मृत्यू :- दामले नगर परिसरातील रहिवासी युवक..
वणी :- सुरज चाटे
रेल्वे अपघात घडत असतात मात्र, रेल्वे रुळावर रात्रीच्या वेळेस कींवा दिवसा सुद्धा त्यावरून चालणे, बसने किंवा त्याला ओलांडणे यांवर रेल्वे प्रशासनाकडून निर्बंध असते. मात्र दिनांक 6 ला रात्रीच्या दरम्यान वणी येथीलच दामले नगर परिसरातील युवक कसा काय तिथे गेला असावा? हे कोडेच. वणी वरून मुकुटबन च्या दिशेने जात असलेल्या रेल्वेच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य रवी दुर्गे (20) असे मृतकाचे नाव आहे.
Railway accidents do happen, however, there are restrictions by the railway administration on walking, bussing or crossing railway tracks at night or even during the day. But how could the youth from Damle Nagar area of Vani have gone there during the night of 6th? This is a puzzle. A shocking incident has come to light that he went on the railway track and died on the spot after being hit by the train. The name of the deceased is Aditya Ravi Durge (20).
वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दामले नगर परिसरातील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ रेल्वे रूळ आहे. वणी येथीलच रहिवासी नामे आदित्य रवी दुर्गे (20) हा दिनांक 6 ला रात्रीच्या दरम्यान रेल्वे च्या धडकेत जबर मार लागल्याने आदित्य चा जागेवरच मृत्यू झाला. त्याचा कसा अपघात झाला? हे अस्पष्ट असुन पोलीस तपासात ते उघड होणार आहे. मात्र आदित्य च्या मृत्यू ने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
सदर घटना वणी पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करत आहे. धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments