ADvt

वणीच्या किंग स्कुटर दुकानाला भीषण आग...





आगीत अं 5 लाखाचे वर नुकसान...

वणीतील श्री रंगनाथस्वामी मंदिर परिसरातील घटना..

वणी :- सुरज चाटे 

     येथीलच श्री रंगनाथस्वामी चौपाटी परिसरातील किंग स्कुटर दुकानाला अचानक आग लागल्याची घटना दि 30 ला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास  घडली.  
     A sudden fire broke out at the King Scooter shop in Sri Ranganatha swamy Chowpatty area on the 30th at around 8:30 pm.
      श्री रंगनाथस्वामी चौपाटी परिसरात वणीचे आराध्य दैवत भगवान श्री रंगनाथस्वामी मंदिराच्या बाजूला असलेले किंग स्कुटरच्या दुचाकी दुरुस्ती व पार्ट च्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली असुन आगेने रौद्र रूप धारण केले होते. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, आगेत दुकानाचे मोठे नुकसान झाले असुन सम्पूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. 
    आग कशाने लागली हे अद्याप स्पष्ट नसुन आगीत अंदाजे 5 लाखाच्यावर नुकसान झाल्याचा कयास वर्तविल्या जात आहे. 
     माहिती मिळताच अग्निशामक विभाग, वणी पोलीस व चमू घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले असुन सदर आगेवर अग्निशमन चालक देविदास जाधव, सहायक कर्मचारी न प वणीचे दिपक वाघमारे, सौरभ पाणघाटे, रितेश गौतम, सेवा निवृत्त कर्मचारी शाम तांबे, व परिसरातील जनतेने नियंत्रण मिळविण्यास मदत केली. 

Post a Comment

0 Comments