ADvt

मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्य जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उदघाटन...



विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या माध्यमातुन मिळाले हक्काचे जनसंपर्क कार्यालय...

वणी :- सुरज चाटे

    महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्य महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्याच प्रमाणे वणी विधानसभेत सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संजय देरकर यांनी "माझी वीज, माझा अधिकार" हे अभियान संपूर्ण विधानसभा क्षेत्रात राबविले. या अभियानाला शासनाकडून काही प्रमाणात दाद सुध्दा मिळाली. शासनाने 7 एचपी पर्यंतच्या कृषी पंपाना वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर, वणी-वरोरा मार्गावरील श्री संत जगन्नाथ महाराज मंदिरा जवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनतेच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय थाटात उदघाटन करण्यात आले.
      On the occasion of Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray's birthday, Public Relations Office was grandly inaugurated near Sri Sant Jagannath Maharaj Mandir on Vani-Varora road to serve the public.
       या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. 


     शनिवारी २७ जुलै ला दुपारी बारा वाजता वरोरा रोडवरील श्री जगन्नाथ बाबा मंदिराजवळ उपस्थित होऊन उत्साह पुर्ण वातावरणात जनते प्रति समस्या सोडविण्याच्या धडपडीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रगट दिनानिमित्त जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. 
      कार्यक्रमाचे उद्घाटक राजेंद्र गायकवाड यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय निखाडे उपजिल्हाप्रमुख, प्रमुख पाहुणे शरद ठाकरे उपजिल्हाप्रमुख, संतोष माहुरे सह संपर्क प्रमुख, सौ. डीमन ताई टोंगे उपजिल्हा संघटिका, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, सुधीर थेरे शहर प्रमुख वणी, गणपत लेडांगे, आयुष  ठाकरे, सुनील दुमणे, रामचंद्र वाभीटकर, प्रशांत बलकी, प्रवीण डोहे, रवी बोढेकर, सतीश आदेवार, समीर लेनगुडे, कुंदन टोंगे, जितू नगराळे, भगवान मोहिते, पारखी सर, संजय देठे,  लोकेशर बोबडे, मनीष बत्रा, विनोद ढुमणे, मो.अस्लम, प्रेमा धानोरकर, राजेंद्र इददे, डॉ.जगन जूनगरी, यांच्यासह अनेक दिग्गज व गण मान्य मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments