युवासेनेचे रस्ता दुरुस्तीकरिता निवेदन :- सर्विस रोड जनतेच्या सेवेत की अपघाताच्या प्रतिक्षेत..
वणी :- सुरज चाटे
वणी - वरोरा - चंद्रपुर मार्गावर व वणी- यवतमाळ मार्गावर उडानपुलाचे कार्य प्रगतीपथावर आहे. मात्र सर्विस रोड ची अवस्था चिंताजनक असल्याने नादुरुस्त व चालण्या योग्य नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ नागरिकांच्या सेवेसाठी सर्विस रोड मुळे नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही या दृष्टीने रस्ता दुरुस्तीची मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांनी दि 26 ला निवेदनातून उपविभागीय अधिकारी वणी यांना केली आहे.
वणीला दोन (वणी वरोरा, वणी मारेगांव रोड) उडानपुल मान्य झाले असुन त्याचे काम देखिल प्रगतीपथावर सुरू आहे. दरम्यान सुरु असलेला सर्व्हिस रोडची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन सर्व्हिस रोड चिखलमय व खड्डेमय झाला आहे. त्यातून नागरिकांना अतिशय चिखलमय खड्डेमय मार्गातून मार्गक्रमण करावे लागते. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये या दृष्टिकोनातून संबंधित ठेकेदारांनी नागरिकांच्या सोईकरिता व नागरिकांना होत असलेला नाहक त्रास लक्षात घेता तातडीने सर्विस रोड दुरुस्त करून घ्यावे.
रोडची तातडीने दुरुस्ती न झाल्यास नागरिकांच्या समस्या लक्षात घेता युवासेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल दरम्यान कोणता अनुचीत प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार व संबंधित प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांनी निवेदनातून उपविभागीय अधिकारी वणी यांना सदर सर्विस रोड दुरुस्तीची मागणी केली आहे. यावेळी कुणाल लोणारे, राजु गोलाईत, सौरभ खडसे, अभी गोलाईत, ललित जुनेजा, हिमांशु बत्रा, सचिन पाटील, अनुप चटप, अनिकेत भेंडाळे, बंटी सहानी, उमेश लेनगुळे, महेश गिरटकर आदी उपस्थित होते.
0 Comments