ADvt

त्या दरोड्यातील तीन आरोपी अखेर गजाआड....




आरोपींचा रेल्वे स्टेशनवरून पळुन जाण्याचा प्रयत्न फसला...

12 लाखाच्या मुद्देमालासह तिघांना अटक 

स्थानिक गुन्हे शाखेचे धडक कारवाई...

वणी :- सुरज चाटे

     पो.स्टे मारेगाव येथे दि. 07 जुन रोजी नामे सलीम सुलतान गिलानी (44), रा. कंरजी ता. केळापुर जि. यवतमाळ हे आपले वाहनात पॅसेंजर घेवुन जात असतांना आरोपींनी घोगुलधरा फाट्यावर सलीम सोबत वाद करुन लाताबुक्यांने व लाकडी दांडयाने मारहान करुन त्याचे पोटाला चाकु लावुन 20 हजार नऊशे रु जबरीने हिसकावल्याने पो.स्टे मारेगाव येथे  गुन्हा नोंद करण्यात आला होता.
     Post at Maregaon dt. On 07 June, Name Salim Sultan Geelani (44), Res. Kanarji T. Kelapur Dist. While Yavatmal was carrying a passenger in his vehicle, the accused had an argument with Salim at the Ghoguldhara road, beat him with sticks and wooden sticks and stabbed him in the stomach and forcibly snatched Rs 20,900, a case was registered at Po.

     सदर गुन्हयात दोन आरोपी अटक असुन ईतर आरोपी फरार होते वरुन दाखल असलेल्या गुन्हयातील फरार आरोपी नामे 1) शुभम सुधाकर कापसे, (30), रा. जामनकर नगर यवतमाळ 2) विकास दिनेश खुडे, (31) रा. सुरज नगर यवतमाळ 3) प्रफुल नारायनराव चौकडे (36), रा. आठवडी बाजार यवतमाळ असे असुन ते नागपुर येथुन बाहेर राज्यात निघुन जात आहेत अशी गोपनिय माहिती मिळालेवरुन पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांना मिळल्यावरून, पथक प्रमुख श्री. सपोनी अमोल मुडे यांना त्यांचे पथकासह तात्काळ दाखल होत आरोपी ताब्यात घेण्याकरीता आदेशित केले. 

     स्थानिक गुन्हे शाखा वणी पांढरकवडा पथक यवतमाळ असे हे तात्काळ नागपुर कडे रवाना होवुन नागपुर रेल्वे स्थानक परीसरात वेगवेगळे पथक तयार करुन आरोपींचा कसोशिने शोध घेतला असता आरोंपीना पोलीस दिसताच पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ चे पथकांनी आरोपींचा पाठलाग करुन रेल्वे स्टेशन परीसरातुन नमुद तीनही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपींना गुन्हयात वापरलेल्या वाहनाबाबत विचारपुस करुन स्क्रापीयो वाहन क्र एम एच 14 डी ऐ 2727 कीमंत अं. 12,000,00 /- रुची ताब्यात घेवुन आरोपी सह पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन मारेगाव येथे पोहचुन तपासी अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले.
    सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक श्री पियुष जगताप, श्री आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनी अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अमलंदार उल्हास कुरकुटे, नरेश राउत, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments