जंगली प्राणी तलावात :- बघ्यांची एकच गर्दी, बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न...
वणी :- सुरज चाटे
वणीतील प्रसिद्ध शिंगाळा तलावात दिनांक 25 ला दुपारच्या दरम्यान अचानक एक जनावर तरंगत असल्याचे दृश्य एकाला दिसले. त्यामागे सुरू झाला तर्क वितर्क ते जनावर नेमकं कोणतं असावं असा कयास वर्तविण्यात येत होता दरम्यान तो जंगली रोही असल्याचे निष्पन्न झाले.
On the afternoon of the 25th, one suddenly saw an animal floating in the famous Shingala lake in Vani. Arguments started after that, it was speculated as to what the animal should be, but it turned out to be a wild Rohi.
शहराच्या मध्यभागी असलेल्या शिंगाळा तलावात एक जंगली रोही तरंगताना आढळला. अगोदर फक्त त्याचे डोकेच दिसल्याने डोक्याने परिसरातील जनतेला जणु तो वाघ किंवा हरीण असावा असा कयास वर्तविला जात होता. त्या ठिकाणी वनविभागाची वणी येथील चमू दाखल होत. घटनेचे गंभीर्य समजले व त्याला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. जमशेद हुसेन, गजानन क्षिरसागर, आफताब खान या तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला पाण्यातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांचा आवाज आणि गर्दी पाहून रोही सैरा वैरा पाण्यात तरंगत होता. दरम्यान बघ्यांची एकच गर्दी पाहायला उसळली होती. वृत्त लिहेपर्यंत रोह्याला बाहेर काढण्यात यश आले नव्हते.
कदाचित तो रोही पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आला असावा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्यात फसला असावा असा कयास वर्तविला जात आहे.
रहदारीच्या परिसरात रोह्याचा वावर झाल्यास...
शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावात रोही पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान वन विभागासमोर रोह्याला काढण्याचे आवाहन उभे ठाकले होते. जर तो भयभीत झालेला रोही रहदारीच्या दिशेने निघाल्यास मोठी अनुचित घटना नाकारता येत नाही. त्यामुळे त्याला पकडुन किंवा जंगलाच्या दिशेनेच मार्गक्रमण करणे आवश्यक असल्याचे बोलल्या जाते होते.
0 Comments