ADvt

अवैध रेती तस्करीवर शिरपुर पोलिसांची धडक कारवाई..


संग्रहित छायाचित्र

वणी :- सुरज चाटे

     दिवसागणिक अवैध रेती तस्करी जोरात सुरू असल्याचे चित्र वणी सह तालुक्यात दिसत आहे. दरम्यान अवैध तस्करीवर तितकेच सजग लक्ष  पोलीस प्रशासनाचे सुद्धा आहे. 
     Day by day illegal sand smuggling is seen in Vani taluk. Meanwhile, the police administration is also paying close attention to illegal smuggling.

     दि 12 ला पेट्रोलिंग करीत असतांना स.पो.नी. माधव शिंदे ठाणेदार, यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन शिरपुर पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना येथील पोउपनि/रावसाहेब बुधवत व पोस्टॉप पोहवा गंगाधर घोडाम, नापोकों/गजानन सावसाकडे यांनी आरोपी नामे सतीष देवीदास काकडे (32) वर्षे रा. ढाकोरी ता.वणी जि. यवतमाळ हा त्याचे लाल रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक MH 29,BC-4173 या ट्रॅक्टरच्या ट्राली मध्ये अंदाजे 1 ब्रास कि.अं 4000/-रु.चा मुद्देमाल विना परवाना बेकायदेशीर रित्या गौण खनिज (रेती) चे पैनगंगा नदी पात्रातुन उत्खनन करुन वाहतुक करतांना मिळुन आला. 
      सदर आरोपीचे ताब्यातुन लाल रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक MH 29,BC-4173 ट्रालीसह कि.अं. 5,00,000/रु व । ब्रास रेती कि.अं. 4000/-रु असा एकुण 5,04,000/-रु चा मुद्देमाल ताब्यात घेउन जप्त करण्यात आला असुन सदर आरोपी विरुध्द कलम 379 भा.द.वी. सहकलम पर्यावरण संरक्षण अधिनियम 15, सहकलम महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सदरची कारवाई मा.श्री.डॉ. पवन बन्सोड पोलीस अधिक्षक साहेब, यवतमाळ. मा.श्री. पियुष जगताप साहेब अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा.श्री. गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे शिरपुर यवतमाळ येथील सहा. पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोउपनि/रावसाहेब बुधवत, पोहवा/गंगाधर घोडाम नापोकों/गजानन सावसाकडे यांनी पार पाडल्ली.

Post a Comment

0 Comments