नोकरी तर मिळाली मात्र जगणे केवळ स्वतःसाठी व कुटुंबासाठी नाही तर समाजाचे काही देणे लागतो...म्हणुनच...
साहेब आपणास जन्मदिनाच्या अगणिक हार्दिक शुभेच्छा..
तालुक्याचे सुपुत्र जेव्हा करतात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व....
वणी :- सुरज चाटे
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रसंग येत असतात आपल्या त्या प्रसंगांना तोंड देत जो समोर जातो तोच खरा जीवनातील बाजीगर ठरत असतो.
संजय खाडे यांची ओळख गेल्या २५ वर्षा पासुन ची आहे ते नोकरीच्या निमित्याने वणीत आले. व नंतर सामाजीक कार्यात सक्रिय झाले. संजय खाडे यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात उकणी ता. वणी जि. यवतमाळ येथे २३ मे १९७० रोजी झाला. त्यानी शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर कोल माईन्स मध्ये नोकरी पत्करली. नोकरीत असताना त्यांनी "जनसेवा हिच इश्वर सेवा" हे ध्येय स्विकारूण त्यांनी नोकरी बरोबरच समाज सेवेस प्रारंभ केला.
ते उकणी गावचे १५ वर्षे सरपंच होते. सरपंच पदाच्या कालावधीत अनेक लोकोपयोगी योजना त्यानी उकणी गावाच्या विकासासाठी प्रभावीपणे राबविल्या, त्यां कार्यकुशलते मुळेच राहुल गांधीच्या महाराष्ट्राच्या यंग ब्रिगेड मध्ये सन २००८ मध्ये त्यांचा श्रीमती मा. यशोमती ठाकुर, स्वर्गिय निलेश पारवेकर यांचे नेतृत्वात वावर सुरू झाला. ही गौरवाची बाब आहे. तेव्हापासुन सुरू झाला त्यांचा राजकिय व सामाजिक कार्याचा प्रवास.
तेव्हापासून तर आता पर्यंत मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्राम पंचायतीची धुरा त्यांनी 15 वर्षे सांभाळली सध्या ते शिवकृपा शेतकरी फाउन्डेशनचे उकणी अध्यक्ष, रंगनाथ स्वामी शेतकरी उत्पादक कंपणीचे अध्यक्ष, जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडीट को ऑप सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच दि. वसंत सह. जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी चे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्यादित, मुंबई चे संचालक आहेत.
सध्या ते वरील निरनिराळया पदावर कार्यरत आहे. सहकार क्षेत्रात नाव लैकीक मिळवीत, वणी येथे भव्य शंकरपटाचे आयोजन त्यांनी केले होते. त्यांचा कामगार चळवळीत सक्रिय सहभाग असुन, सामाजिक चळवळीत दानत्व स्विकारलेले आहे. शेतकऱ्याच्या व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ते सतत संघर्षरत आहे. गाव खेडयात सामान्य शेतकरी कुटुंबाच्या पोटी जन्मलेल्या संजय खाडे यांचा हा धगधगता जीवन प्रवास खरच मनाला थक्क करणारा आहे. आज त्यांचा ५४ वा वाढदिवस या शुभ दिना निमित्य वणी विधानसभेतील जनतेकडून व मित्र परिवाराकडून त्यांना भरभरून अशीच उंच उंच शिखरे आपण गाठावी जनसेवेत अग्रेसर रावाहे हिच शुभेच्छा..
संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात गुरुवारी दिनांक 23 मे रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, धार्मिक, आरोग्य, शेतीविषयक उपक्रमांचा समावेश आहे.
स. 8 वाजता रंगनाथ स्वामी मंदीर, वणी येथे पूजा व सत्कार समारंभ, स. 9 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी, 10.30 वाजता कायर, दुपारी 11 वाजता मुकुटबन, दु. 12.30 वाजता भीमनाळा,घोन्सा येथे दु 1 वाजता. वणी येथे दु. 2 वा. तर दु. 4 वाजता मारेगाव येथील शेतकरी मंदिर व संध्या 6 वाजता वणी येथील बाजोरिया लॉन येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाला स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय खाडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
0 Comments