ADvt

वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची उज्वल यशाची परंपरा कायम...



वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची उज्वल यशाची परंपरा कायम...

वणी :-  सुरज चाटे

     छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेच चे उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही बारावीत स्टेट बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. 
     दिनांक 21 मे रोजी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत वाणिज्य शाखेत काजल उमेशचंद कोचर 91.50 गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच खुशी हेमंत सहारे 89.50, मोहिनी मारोती खोकले 89.17, तृप्ती ओंढरे 85.33, भूमिका कळसकर 88.17, समिक्षा पोतराजे 81.50, स्वामींनी घोडके 80.50 आणि विज्ञान शाखेत लक्ष योगेश कुमरावत या विद्यार्थ्याने 80.33 टक्के, महेक अजय लाल 64.50, मानसी राजेश पाटील 62.83  या विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट येण्याचा मान मिळविला आहे. संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा, निलेश चचडा, विक्रांत चचडा व प्राचार्य राजुरकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले व त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments