वणी पोलिसांची कारवाई :- तब्बल 18 दिवसानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ...
वणी :- सुरज चाटे
काही दिवसा अगोदर 28 एप्रिल रोजी झालेल्या चौकीदार हत्या प्रकरणाचा वणी पोलिसांनी कसून तपास करीत प्रकरणाचा छडा लावला असून चौकिदराचा खून व चोरी करणाऱ्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या तब्बल 18 दिवसानंतर पोलिसांना यश मिळाले आणि आरोपी अजीम शाह रमजान शाह (35) रा. कलंदरी मस्जिद जवळ कारंजा (लाड), मोहम्मद उमर अब्दुल गनी (36) कारंजा लाड व एक विधी संघर्ष ग्रस्त बालकाचा यात समावेश आहे वरील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
A few days earlier, the case of the chowkidar's murder that took place on April 28 has been thoroughly investigated by the Vani police and the police have arrested the killer who killed the chowkidar. After 18 days of the incident, the police got success and arrested the accused Azim Shah Ramzan Shah (35). Karanja (Lad), Mohammad Umar Abdul Ghani (36) Karanja Lad and a child suffering from legal conflict were arrested near Qalandari Masjid.
वणी यवतमाळ मार्गावर पळसोनी फाट्या जवळ योगेश ट्रेडर्स यांचे सिमेंट गोदाम आहे. तेथील चौकिदराचा 28 एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याने खून करून लोखंडी सळाखीचे 4 बंडल चोरले होते. चोरी व खून प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी वणी, मारेगाव, मुकुटबन इत्यादी रस्त्याचे 100 पेक्षा जास्त सीसीटिव्ही फुटेज तपासले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व वणीचे ठाणेदार अनिल बेहराणी यांची हे प्रकरण उघड करण्यात महत्वपूर्ण भूमिका ठरली आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्याचे आवाहन पोलिसांपुढे ठाकले होते. डोकेदुखी ठरलेल्या या मर्डर केसच्या घटनेच्या 18 दिवसानंतर उलगडा झाला असुन. आरोपी अजीम शाह रमजान शाह याचा भंगार व जुने टायर खरेदी विक्रीचा धंदा असून त्याच्यावर विविध पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल आहे. आरोपी गोदामाबाहेर लोखंडी साळाखी चोरत असताना चौकीदार जीवन विठ्ठल झाडे याला जाग आली व त्यांनी चोरट्याचा विरोध केला. यामुळे आरोपीने चौकिदराच्या डोक्यावर व बरगडीवर लोखंडी रॉडने प्रहार करून जिवानिशी ठार केला. परंतु त्यांच्या या चोरीत एक निष्पाप बळी गेला असुन अखेर आरोपीना सुद्धा गजाआड करण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक यवतमाळ पवन बनसोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी वणी,l गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि बलराम झाडोकार, धिरज गुल्हाणे, सुदाम आसोरे, अश्विनी रायबोले, रामेश्वर कांडुरे, पोहेकॉ सुहास मंदावार, विकास घडसे, विजय वानखडे, सुधीर पांडे, योगेश डगवार, पोना/पंकज उंबरकर, अमोल अन्नेरवार, अविनाश बानकर, निलेश निमकर, पोकों/शाम राठोड, विशाल गेडाम, मोहमंद वसीम, रितेश भोयर, अमोल नुन्नेलवार, संतोष कालवेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकर यांनी केली.
0 Comments