तेजस्विनी गव्हाणेवर शुभेच्छांचा वर्षाव :- मैदानी खेळासह शिक्षणातही आव अव्वलच...
वणी :- सुरज चाटे
शिव आनंद, रॉयल फाऊंडेशन वणी व क्रांती युवा संघटने च्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, आदी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके तसेच उन्हाळी शिबिराचे आयोजन नित्याचे करण्यात येते याचे नेतृत्व अवघ्या दहाव्या वर्गात शिकणारी युवा प्रशिक्षक तेजस्विनी राजुभाऊ गव्हाणे करीत होती आज नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असुन तेजस्विनीने या परीक्षेत गरुड झेप घेतली आहे तिची कामगिरी पाहुन कुटुंब सुद्धा आनंदात असुन तिने दहावीत 100 टक्यांपैकी 94.40 टक्के घेत मेरिट मध्ये येण्याचा मान मिळविला आहे.
With the joint association of Shiv Anand, Royal Foundation Vani and Kranti Yuva Sangathan, demonstrations of lathikathi, dandapatta, fencing and other manly sports as well as summer camps are organized regularly. Tejaswini has soared in this exam, her family is also happy to see her performance and she has achieved the honor of getting merit with 94.40 percent out of 100 marks in class 10th.
वणी तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजु देवरावजी गव्हाणे यांची मुलगी तेजस्वीनी असुन ती एस पी एम हायस्कूल येथे शिक्षण घेत होती. वडीलांप्रमाणे तिच्यात सुद्धा समाजीकतेची जाणीव आहे. बालपणापासूनच साहसिक खेळाची आवड तिला आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून तिने आखाड्यात लाठीकाठी व इतर साहसिक खेळांचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पुढील प्रशिक्षण तिने नागपूर येथील सुप्रसिद्ध लाठीकाठी वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या ताजराज हिरा आखाडा येथे घेतले आहे सोबतच तिने आपली चमु बनवून तिने स्वतः घेतलेले गुण दुसऱ्या मुला मुलींना ती देत असुन त्यामुळे शरीर सुदृढ व मर्दानी डाव अंगीकृत असते, यातून बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी तिच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.
तेजस्विनीला लाठिकाठीसह तलवारबाजी, दांडपट्टा, बाना, भालाफेक आदी साहसिक खेळात निपून आहे. याशिवाय कराटे या खेळातही ती ब्लॅक बेल्ट आहे. विविध साहसिक खेळासह ती वकृत्व, इतर कला व सामाजिक कार्यतही ती अग्रेसर असते. तिने नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सर्व विषयात 90 पेक्षा अधिक गुण संपादन करीत सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळविला आहे. तिने 500 पैकी 472 गुण मिळवीत 94.40 टक्के गुण प्राप्त केले आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई वडील, गुरुजन, शिक्षक, आजी आजोबा व जेष्ठांना देत आहे.
0 Comments