तर आय पी एल जुगारावर कारवाई :- स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई.
सध्या वणीसह परिसरात खाया लागायाची धुम
वणी :- सुरज चाटे
एक इसम हा गावठी बनावटीची पिस्टल (कट्टा) घेवुन परिसरात फिरत असल्याच्या गोपनीय माहीतीवरून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच सध्या वणीसह परिसरात मोठ्या प्रमाणात आय पी एल मॅच सट्टा लावल्या जात आहे. दिनांक 16 ला तालुक्यातील वागधरा गावाजवळ अवैध के. के. आर विरुध्द राजस्थान रॉयल्स क्रिकेट मॅच वर मोबाईल फोन वर सट्टा घेणाऱ्या वर कारवाई करण्यात आली.
Action was taken against him based on confidential information that one Isam, a villager, was roaming around the area with a pistol (katta) made by a villager. Also, a large amount of IPL match betting is currently being done in the area including Vani. On 16th, action was taken against illegal KKR vs Rajasthan Royals cricket match near Wagdhara village in the taluka on mobile phones.
आगामी लोकसभा निवडणुक संबंधाने पाहिजे व फरार असलेले आरोपी व वारंट मधील आरोपी शोध, अवैध धंदे विरुध्द कारवाई, अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार तसेच संशयीत व सक्रीय गुन्हेगारांची माहिती काढुण गुन्हे उघडकीस आणने बाबत मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक प्रयत्नशील असतांना यवतमाळ उपविभागात पेट्रोलींग करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला दिनांक 16 ला गोपणीय बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, एक इसम हा गावठी बनावटीची पिस्टल (कट्टा) घेवुन यवतमाळ जोडमोहा रोडवरील मामा चा ढाबा परिसरात फिरत आहे.
अशा विश्वसनीय माहिती वरुन पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठुन प्राप्त माहितीची खातरजमा करणे करीता माहिती प्रमाणे इसमाचा शोध घेत असतांना गजानन भाऊराव गायकवाड वय ४६ रा. विदर्भ हाऊसींग सोसायटी यवतमाळ हा संशयास्पद स्थितीत मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन अंगझडती घेतली असता एक (गावठी) देशी कट्टा किमंत ५०,००० रु व ०२ नग जिवंत काडतुस असा एकुण ५०,४०० रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करुन आरोपी गजानन भाऊराव गायकवाड वय ४६ रा. विदर्भ हाऊसींग सोसायटी यवतमाळ यांचे विरुध्द पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आयपीएल सिजन १७ सुरू आहे. दि 16 ला गोपणीय माहिती च्या आधारे वागदरा गावाजवळील हनुमान मंदीराजवळ काही इसम आयपीएल सिजन १७ मधील के. के. आर विरुध्द राजस्थान रॉयल्स या क्रिकेट मॅचवर मोबाईल फोनव्दारे सट्टा घेवुन हारजीतचा खेळ खेळवीत आहेत अशा माहिती वरुन पोलीस पथकाने तात्काळ वागदरा गावाजवळील हनुमान मंदीर परिसरात कारवाई केली असता यात १) मधुकर तात्याजी पारखी, (३८) रा. रामपुरा वार्ड वणी, २) अरविंद जनार्धन गोहोकार, (३९) रा. शास्त्रीनगर वणी, ३) आशिष रमेश मेश्राम, (२२) रा. रामपुरा वार्ड वणी हे तिघे के. के. आर विरुध्द राजस्थान रॉयल्स या सुरु क्रिकेट मॅचवर मोबाईल फोनव्दारे सट्टा घेवुन हारजीतचा खेळ खेळवीत असतांना मिळुन आले त्यांचे ताब्यातुन ०५ मोबाईल फोन, नगदी ४,८०० व ०१ मोटार सायकल असा एकुण १,०६,८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस स्टेशन वणी येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई नोंद करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि विवेक देशमुख, सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार, से साजीद, अजय डोळे, रितुराज मेडवे, रुपेश पाली, निलेश राठोड, योगेश टेकाम, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 Comments