चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा
जनसामान्यांचा सुर :- मतदारांचा लोकसभेचा कौल यांच्याकडे राहणार?...
वणी :- सुरज चाटे
सध्या विविधमाध्यमाद्वारे आपला प्रचार प्रसार लोकसभेचे दिग्गज उमेदवार करीत आहे. मात्र अनेक सोशल मीडियावर रिल्स वायरल होत असुन ती रिल्स मात्र मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. विविध सोशल माध्यमातून तसेच सर्वत्र सुद्धा मतदानाबाबत जनजागृती होत असुन प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.
At present, veteran Lok Sabha candidates are campaigning through various media. But the reels are going viral on many social media and those reels are becoming a big topic of discussion. Public awareness about voting is also being spread through various social media and everyone is being urged to exercise their right to vote.
लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे जो तो आपल्या उमेदवाराला कसे निवडून आणता येईल या दृष्टिकोनातून राजनीतीक गणित आखताना दिसत असुन सुज्ञ मतदार मात्र कोणाच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपले मत विकास, शैक्षणिक, व आरोग्य या विषयी कार्य सम्राटालाच असे काहीसे बोल स्पष्ट करीत आहे. तर विविध धाब्यांवर रोजच्या बैठका झाल्यावर मग कार्यकर्त्यांमधी मात्र खमंग चर्चा सुटताना दिसत आहे. विविध सोशल मिडियावर एक रिल्स व्हायरल होत असून त्यात खावा कुणाचं बी मटण...पण दाबा योग्य उमेदवाराचे बटन अशी म्हण मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.
तोंडावर मतदानाचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अनेक नेत्यांचे उमेदवारांचे रोड शो होत आहे कित्येकांनी आपल्या रोड शो करिता अभिनेत्याना निमंत्रित केले आहे. मात्र नेटकरू यांच्या अनेक प्रतिक्रिया या विविध सोशल माध्यमांवर पसरत असलेल्या रिल्सवर उमटत असुन चौकाचौकात याची जोरदार चर्चा रंगतांना दिसत आहे. आता मतदार कुणाचे खाऊन कुणाच्या बाजूने उभे राहिल? हे निकलातूनच स्पष्ट होणार असल्याचे दिसत आहे.
0 Comments