मंदिर प्रशासन त्या घंटेला दर्शकांना बघण्याकरिता ठेवणार :- घंटा इतकी जुनी मग मंदिर किती जुने असावे?..
वणी :- सुरज चाटे
वणीतील श्री रंगनाथस्वामी मंदिर हे जगसिद्ध मंदिरांपैकी एक असुन वणीचे आराध्यदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. येथीलच मंदिरात केलेल्या साफसफाई दरम्यान एक 700 वर्षाहून अधिक जुनी अं 5.8 किलोची घंटा आढळली आहे. आता घंटाच 700 वर्ष जुनी आहे तर मग मंदिर किती जून असाव?, याचा नेमका इतिहास काय असावा? असा प्रश्न असुन मंदिरातील घंटा बघण्यासाठी बघ्यांनी आपला पाय मंदिराच्या दिशेने वळता केला आहे.
Shree Ranganathaswamy Temple in Vani is one of the Jagasiddha temples and is famous as the deity of Vani. A 700 year old bell weighing 5.8 kg has been found during the cleaning of the temple here. Now the bell itself is 700 years old, then how old should the temple be?, what should be the exact history of it? With this question, the visitors have turned their feet towards the temple to see the bell in the temple.
सांगण्यात येते की, दक्षिण भारत येथील पंडित विष्णु भगवान यांची मूर्त घेऊन उत्तरे कडून दक्षिणेकडे जात असताना त्यांना रात्र झाल्यामुळे त्यांनी वणीत आराम केला. त्यावेळी सदर परिसर हा जंगल परिसर होता. दुसऱ्या दिवशी ती मूर्त इतकी जड झाली की कोणीही त्या मूर्तीला उचलू शकले नाही. त्यामुळे मूर्त तिथेच राहिली. दरम्यान त्याच मूर्तीचे रूपांतर आता श्री रंगनाथ स्वामी मंदिरात झाले आहे. याला शेकडो वर्षाचा इतिहास आहे.
काही दिवसा अगोदरच मंदिरातील सफाई दरम्यान कचऱ्यात पडलेली एक घंटा सेवक विशाल ठोंबरे यांना आढळली. त्यावर मोठा मड साचून होता व ती कीटून होती. त्यांनी त्या घंटेला साफ केली व त्यावर मराठी देवनागरी लिपीत श्री रंगनाथ स्वामी देवस्थान वणी स. 1322, दासपेट यागगया जगमगंटूवार वणी असे यावर कोरले आहे. दरम्यान घंटाच 702 वर्ष जुनी आढळल्याने मंदिराला किती वर्षे झाली असावी? पुरातन हे मंदिर आकर्षणाचा विषय ठरत असुन घंटा पाहण्यासाठी मात्र बघ्यांनी आपला पाय मंदिराकडे वळता केला आहे.
0 Comments