रेल्वे अपघातात 21 वर्षीय युवकाचा मृत्यू...
मांगली येथील घटना...
वणी :- सुरज चाटे
रेल्वे अपघात घडत असतात मात्र, रेल्वे रुळावर रात्रीच्या वेळेस कींवा दिवसा सुद्धा त्यावरून चालणे, बसने किंवा त्याला ओलांडणे यांवर रेल्वे प्रशासनाकडून निर्बंध असते. मात्र दिनांक 6 ला सायंकाळच्या दरम्यान मांगली येथील युवक लघुशंकेसाठी रेल्वे च्या पटरी वर गेला आणि रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश रवींद्र सातघरे असे मृतकाचे नाव आहे.
Railway accidents do happen, however, there are restrictions by the railway administration on walking, bussing or crossing railway tracks at night or even during the day. However, on the evening of 6th, a shocking incident has come to light that a youth from Mangli went on the railway track for a short train and died on the spot after being hit by the train. The name of the deceased is Akash Ravindra Satghare.
वणी विधानसभा क्षेत्रात मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगली गावात रेल्वे रूळ आहे. मांगली येथीलच रहिवासी नामे आकाश रविंद्र सातघरे (21) हा दिनांक 6 ला सायंकाळी लघुशंकेसाठी रेल्वे पटरीकडे गेला असता आकाश चा रेल्वे च्या धडकेत डोक्याला जबर मार लागल्याने आकाश चा जागेवरच मृत्यू झाला. त्याचा कसा अपघात झाला? हे अस्पष्ट असुन पोलीस तपासात ते उघड होणार आहे. मात्र आकाश च्या मृत्यू ने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर घटना मुकुटबन पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटणा स्थळांचा पंचनामा करुन मॄतदेह दि 7 ला सकाळी (पहाटे) ४.०० वाजता शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय वणी येथे आणण्यात आला. सदर घटणेचा तपास मुकुटबन पोलीस करत आहे. सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments