ADvt

वहिनी की ताई, आणि भैय्या की भाऊ?...वारां मध्येच लढत होण्याचे संकेत?



लोकसभेची रणधुमाळी....

वहिनी की ताई, आणि भैय्या की भाऊ?...वारां मध्येच लढत होण्याचे संकेत?...

लवकरच दिल्लीतुन - गल्लीत येणार उमेदवाराचे नांव? :- काहींची स्थानिकांना प्राधान्य देण्याची पक्षश्रेष्ठींकडे मागणी...

वणी :- सुरज चाटे

        लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असुन जो तो आप आपली उमेदवारी कशी पक्की होईल? या दिशेने पाऊल उचलण्यास सुरवात केली आहे. दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा विरोधी पक्ष नेते यांची कन्या शिवानी वडेट्टीवार ही सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अगोदर खासदार असलेले व लोकसभेत चांगली पकड असलेले स्व बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाने त्यांची खासदारकीची गादी त्यांच्या पत्नीला मिळावी अशी काहींची ईच्छा आहे. 

     How will AAP confirm its candidacy when the battle for Lok Sabha has started? Steps have been taken in this direction. Meanwhile, senior Congress leader and leader of opposition's daughter Shivani Wadettiwar is also willing to contest the Lok Sabha elections, according to sources. Meanwhile, after the death of Swa Balubhau Dhanorkar, who was an MP earlier and had a good hold in the Lok Sabha, some want his wife to get the seat of MP.
    मात्र दिल्लीतील बैठकीत काही वेगळेच समीकरण तयार होत असल्याचे दिसत असुन एकीकडे काँग्रेस च्या एकाच पक्षातील दोन युवा महिला ह्या खासदारकी करिता आपली दावेदारी सादर करीत असल्यातरी इकडे भक्कड पक्ष असलेल्या भाजपा चे माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर तथा वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची सुद्धा जोरदार खमंग अशी चर्चा रंगतांना दिसत आहे.  मग उमेदवारी कुणाला मिळणार? यांवर मात्र पक्षश्रेष्टींचा अंतिम निर्णय असला तरी हे चारही चेहरे चंद्रपुर - आर्णी लोकसभेत चर्चेचा विषय ठरत आहे. 
      Former Union Minister of State Hansraj Ahir of the Bhakkar Party and Forest Minister A. Sudhir Mungantiwar's name is also being discussed very hotly. So who will get the nomination? However, even though the party leaders have the final decision on this, these four faces are becoming a topic of discussion in the Chandrapur-Arni Lok Sabha.
      आता कोणत्याही क्षणी सर्व पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याचे संकेत असुन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अंतिम टप्यात स्व बाळूभाऊं धानोरकर यांना उमेदवारी घोषित झाली होती. दरम्यान आता नेमके काय घडणार याला नेम राहिला नसुन चारही उमेदवारांच्या बाजु भर भक्कम असून एकमेकांना कुठेही कमी न पडणारे उमेदवार रिंगणात उतरल्याने आता पक्ष श्रेष्टी कुणाच्या गळ्यात लोकसभेच्या उमेदवारीची माळ घालणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

वारां......मध्येच अंतिम लढत होण्याचे संकेत?.....
      लोकसभे साठी वनमंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नांव चांगलेच चर्चेत असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार हे सुद्धा चंद्रपुर - आर्णी लोकसभेसाठी आग्रही असुन अखेर लढत मुनगंटीवार.... वि .... वडेट्टीवार अशी तर होणार नाही ना? की दोघांच्या मधात याचा फायदा कोणी तिसराच उचलुन बाजी तर मारणार नाही?... अशा एक ना अनेक चर्चा रंगत असुन लढत मात्र चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments