ADvt

आज वणीत हंबरते गाय वासराची.....



झाडीपट्टीतील एकता नाट्य कला मंच :- शंकरपटा निमित्य खास मेजवानी...

उन्हाने व्हतंय लायी लायी परंतु हवाश्यांना शंकरपट बघण्याची घाई...

वणी :- सुरज चाटे 

     वणीतील जत्रा मैदान येथे मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारीपासून तीन दिवसीय जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात बैलजोड्या उपस्थित होत्या, यात लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आले असून राज्यभरातील सुमारे 150 ते 200 बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे. आज दुसरा दिवस असुन दिनांक 21 ला सायंकाळी 6 वाजता खास मेजवानी झाडीपट्टी कलाकारांचे नाटक हंबरते गाय वासराची हे अप्रतिम नाटकाचे सुद्धा आयोजन केले आहे. 
     Today is the second day and on the 21st at 6 pm a special party is also organized for the amazing play Hambarte Gai Vasarachi by Zadipatti artists.

    शंकरपट पाहण्यासाठी दूरवरून लोकांची बघण्यासाठी गर्दी एकवटली असुन उन्हाने व्हतंय लायी लायी परंतु हवश्यांना शंकरपट बघण्याची घाई असेच काहीसे चित्र दिसत आहे.  शंकरपटात नाशिक, पुणे, नागपूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव इत्यादी ठिकाणाहून बैलजोडी आल्या आहे. तर वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडात ही विशेष स्पर्धा राहणार आहेत. दिनांक 21 ला सायंकाळी 6 वाजता हंबरते गाय वासराची या अप्रतिम झाडीपट्टीतील नाटकाचे आयोजन सुद्धा करण्यात आले असुन यात सिने. मुन्नाभाई विके, जा. लेखकाराम हुलके, सिने प्रविण वाघमारे, सिने, राहुल वासनकर, स्वर निकेश खोबर, प्रा. अतिवास सहारे, लालु पेंदाम, प्रदिप उके, बाल- यश कुमार, सिने सोनल गोरखे, मिस करिष्मा भाग्यवंत, मोस ज्योती राऊत,  मिस स्नेहल गेडाम विविध भूमिकेत नाटकात दिसणार आहे. 

      शंकरपटात अ गटात पहिले बक्षिस 1 लाख 1 हजार, दुसरे 71 हजार, तिसरे 51 हजार रुपये यासह तेरा रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तर क गटात पहिले बक्षिस 41 हजार, दुसरे 31 हजार, तिसरे 21 हजार यासह आणखी तेरा बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. तर गावगाडा स्पर्धेसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहे. तरी होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक समितीने केले आहे. 

Post a Comment

0 Comments