ADvt

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पर्वावर रंगली शिवकालीन चित्तथरारक प्रात्यक्षिके....



वणी :- सुरज चाटे
     
     भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते. वणीतही त्याची धूम पहावयास मिळते. शिव आनंद व रॉयल फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, आदी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके वणीच्या श्री रंगनाथ स्वामी मंदिरा च्या प्रांगणात 100 च्या वर चिमुरड्यांची चमु तयार होत शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याचे नेतृत्व अवघ्या 10 व्या वर्गातील विद्यार्थिनी व प्रशिक्षक तेजस्विनी राजु गव्हाणे हिने केले.
      In India, Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary is celebrated with great pomp. Its influence can also be seen in Vani. A group of more than 100 children greeted Shivaji Maharaj in the courtyard of Shree Ranganath Swami Mandira, Vani, with demonstrations of lathi-kathi, dandapatta, swordsmanship, etc. It was led by Tejaswini Raju Gavane, a 10th class student and coach.
     प्रत्येक महिला व पुरुषात बचावाचे असे काही मर्दानी गुण असणे काळाची गरज असुन आजच्या आधुनिक युगात असे मर्दानी खेळ लुप्त होत चाललेआहे. शिव आनंद व रॉयल फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने शहरातील श्री रंगनाथ स्वामी मंदिरा च्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पावण पर्वावर शिवकालीन प्रत्यक्षिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चोरडिया हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राकेश खुराणा, वणीचे ठाणेदार अनिल बहेरानि, डॉ महेंद्र लोढा, पांडुभाऊ लांजेवार, मुन्नामहाराज तुग्नायत, ऍड निलेश चौधरी, रोहित वनकर, दादाजी पोटे, राजाभाऊ पाथ्रडकर आदी उपस्थित होते. 
    छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या डोक्यात असावे असे मत उपस्थितांनी व्यक्त करीत अंगीकृत असलेले हे मर्दानी खेळ पाहता अधुनिकतेकडे वळणारे त्याकडे पाठ फिरवीत हे गुण घ्यायचा प्रयत्न करीत असल्याचे यावेळी आपल्या भाषणातून उपस्थितांनी बोलून दाखविले. गेल्या काही काळात मर्दानी खेळाचे प्रशिक्षण विशेष म्हणजे हे प्रशिक्षण एक महिला चिमुकली अवघ्या 10 व्या वर्गात शिकत असलेली कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे प्रशिक्षण देत आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर भाषणे दिली. 
      यात लाठिकाठीसह, तलवारबाजी, दांडपट्टा, बाना, भालाफेक आदी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.  100 च्या वर चिमुरड्यांची चमु चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवीत प्रेक्षकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. 

Post a Comment

0 Comments