वणी :- सुरज चाटे
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले राजु गव्हाणे यांचे वडील वस्ताद देवरावजी गव्हाणे यांचे वयाच्या 82व्या वर्षी भाग्यशाली नगर, येथील राहते घरी निधन झाले.
वणीतील राजुभाऊ व विजुभाऊ देवरावजी गव्हाणे यांचे वडील देवरावजी गव्हाणे, वय अं 82 वर्ष, यांनी दिनांक 13 जानेवारी 2023 ला पहाटे अं 5.10 वाजताच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला दरम्यान त्यांच्या पार्थिवावर दिनांक 13 ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या मागे मुलं, मुली, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments