ADvt

पहिल्या साहित्य कलाकृतीचा आनंद निराळाच---अमराबाई गेलडा



वणी :- सुरज चाटे

   समाजसेवा आयुष्यभर करतांना आलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करतं गेले व मन की तरंग ही पहिली साहित्य कलाकृती जन्माला आली असे विचार अमराबाई गेलडा यांनी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर मा विजयराव मुकेवार, मा संजीवरेड्डी बोदकुरवार, मा सुरेशबाबु खिवंसरा, मा प्रा डॉ.अभिजित अणे तसेच मा ताराताई ठाकरे उपस्थित होते. 
                समाजजीवनात तसेच वैयक्तीक जीवनात अनेक चढउतार आलेत परंतु कधीही कोणाबद्दल आकस बाळगला नाही तर आलेल्या अनुभवांचा परीपाक म्हणजे मन की तरंग होय. हे पुस्तक प्रकाशित करण्यात नातवांचे विशेष योगदान आहे त्यांना आशिर्वाद आहेच तसेच त्यांच्या उज्वल भविष्याची मनोकामना अमराबाई गेलडा यांनी व्यक्त केली. 
       याप्रसंगी गेलडा परिवाराशी असलेल्या वैयक्तीक संबंधाचा उल्लेख करून अमराबाईंचे समाजकार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवपूर्ण उद्गार  मा विजयराव मुकेवार यांनी व्यक्त केले. या प्रसंगी शि. प्र. मंडळ व व्यापारी मित्र बँकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल गेलडा परिवारातर्फै मा विजयराव मुकेवार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

     समाजात कुठलीही समस्या असली तर त्याची ताबडतोब माहिती अमराबाई मला देतात त्यामुळे समाजातील समस्या सोडविण्यात मला फार मदत होते असे मनोगत व्यक्त करून मा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अमराबाई गेलडा यांना दीर्घायुरारोग्य लाभो असे विचार व्यक्त केले. 

        अमराबाईची पहिली साहित्य कलाकृती ही त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष असल्याचा निर्वाळा पुस्तकावर भाष्य करतांना  प्रा डॉ.अभिजित अणे यांनी दिला मन की तरंग या पुस्तकातील अनेक कवितांचा उल्लेख करून त्या वैयक्तीक तथा सामाजिक पातळीवर कश्या यथोचित आहेत हे सुद्धा डॉ.अभिजित अणे यांनी उपस्थितांना सांगीतले. या प्रसंगी गेलडा परिवारा तर्फै अॅड  संजय बोरा, गणेश गुप्ता तथा श्रेया कोटेचा यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. 
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना बोरा यांनी तर आभार प्रदर्शन सपना लुनिया यांनी केले. कार्यक्रमास गेलडा परिवारातील सदस्यांची तसेच वणीतील गणमान्य नागरीकांची उपस्थिती लक्षणीय होती.

Post a Comment

0 Comments