टी 10 चॅम्पियन लिगचे आज उदघाटन :- सुप्रसिद्ध नूत्यांगना गौतमी पाटील वणीत...
वणी :- सुरज चाटे
पारसमल प्रेमराज ज्वेलर्स प्रस्तूत टी-10 चॅम्पियन लीग 2024 टेनिस बाॅलचे रात्रकालीन स्पर्धा ही वणीच्याच नाही तर यवतमाळ जिल्ह्यातील क्रिडा विश्र्वाच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धेचे आयोजन वणी येथील शासकिय मैदान पाणीच्या टाकीजवळ करण्यात आले आहे.
यात विविध टीममध्ये वणी विधानसभा क्षैत्रातील धडाकेबाज खेळाडूंचा सहभाग असणार आहे. दिनांक 29 डिसेंबर ला रात्री 7 वाजता उद्दघाटन सोहळ्याचे प्रमूख आक्रर्षण महाराष्ट्राची सूप्रसिद्ध असलेल्या नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जल्लोषात विविध गाण्यांवर तरुणाई थिरकणार असुन सबसे कातिल गौतमी पाटील वणीत म्हटल्यावर तरुणाईला आता फक्त उदघटनाचीच वाट असल्याची चर्चा असुन टी-10 चॅम्पियन लीग 2024 चांगलीच रंगतदार होणार आहे.
या उद्दघाटन सोहळा व कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन चॅम्पियन लीग चे कार्यकारणीचे अध्यक्ष अँड कूणाल विजयबाबू चोरडिया यांनी केले आहे.
0 Comments