ADvt

अरे बापरे.. जन्मदिवसाला चक्क रिव्हॉल्वर ने हवेत आतिषबाजी...




विदेशी रिव्हॉल्वरसह तरुणाचा वावर :- गुन्हेगाराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

वणी :- सुरज चाटे

     वणी तालुक्यातील, राजूर येथे उमेश किशोरचंद राय रा. प्रगतीनगर कोलार प्रिंप्री, ता. वणी हा रेकार्ड वरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर पोलीस स्टेशन वणी येथे खुन, अपहरण सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे आरोपी हा मागील १ वर्षापुर्वी खुनाचे गुन्हयातुन कारागृहातुन सुटला होता व तो आपले सोबत अग्निशस्त्र बाळगुन फिरत असले बाबत गोपनीय व खात्रीशीर माहीती वणी पोलिसांना मिळाली त्यात राजुर ते भांदेवाडा रोड येथून त्यास ताब्यात घेण्यात वणी पोलिसांना यश आले आहे दरम्यान तो पोलिसांनाही चकमा देत पळ काढण्याच्या तयारीत असताना त्याला शिताफीने अटक करण्यात आले.  
     Umesh Kishorechand Rai Res., Rajur, Vani Taluk. Pragatinagar Kolar Primary, Vani is a criminal on record and he has been booked in police station Vani for serious crimes like murder, kidnapping. The accused was released from prison for the crime of murder 1 year ago and the police received confidential and reliable information that he was moving around with a firearm. Rajur Te Vani police have succeeded in arresting him from Bhandewada road, while he was preparing to run away while dodging the police, he was arrested by Shitafi.

      दिनांक 27 रोजी श्री गणेश किंद्रे उप विभागीय पोलीस अधिकारी सा.वणी यांना गोपनीय माहीती मिळाली की, राजुर ते भांदेवाडा रोड लगत असलेल्या कश्यप यांचे शेतात उमेश राय याचे वाढदिवसानिमीत्ताने पार्टी आयोजीत केली आहे. अश्या खात्रीशीर व गोपनीय खबरे वरून उप विभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित जाधव पोलीस स्टेशन वणी यांनी नमुद ठिकाणी दिनांक 27 च्या मध्यरात्री (28 चे ०२/०० वा) पोलीस स्टाफ सह ठिकाणी गेले असता तेथे थांबुन असलेले काही ईसमांची पोलीस पाहून पळापळ सुरू झाली. त्यातच उमेश किशोरचंद राय हा पळुन जाउ लागला त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले असता त्याचे जवळ एक स्टिलची जिचे मुठीवर लाकडी पटट्टी असलेली मॅग्झीनची पिस्टल (अग्नीशस्त्र) मिळुन आली. त्यास पिस्टल बाबत विचारपुस केली असता वाढदिवस निमीत्ताने घेवुन आलो व वाढदिवसाचा केक कापतांना दोन रांउड हवेत फायर केले असल्याचे सांगीतले व तेथील ठिकाणी पाहणी केली असता दोन फायर केलेले खाली केस मिळुन आले. पिस्टल व दोन खाली केस जप्त करण्यात आले वरून पो.स्टे. वणी येथे अप.क.१३५४/२३ कलम ३,७,२५,२७ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी उमेश राय यास अटक करण्यात आली.

    सदरची कार्यवाही मा. डॉ. पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. रामेश्वर वैजने उप वि.पो.अ.वणी, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक/अजित जाधव ठाणेदार वणी, जनार्धन खंडेराव सपोनि मारेगांव, सपोनि दत्ता पेंडकर, सफौ/सुदर्शन वानोळे, पोना/पंकज उंबरकर, पो.ना/संतोष आढाव, पो.ना. / अमोल अन्नेलवार, पो.ना./अविनाश बनकर, पोकों/विशाल गेडाम, पोकों/श्याम राठोड, मो. वसीम, पो.कॉ/पुरूषोत्तम डडमल, पो. कॉ/ गजानन कुडमेचे पो.कॉ/ निरंजन खिरडकर यांनी केली.



Post a Comment

0 Comments