वणी :- सुरज चाटे
धानोजे कुनबी विकास संस्थे द्वारे आयोजीत शारदा महोत्सव दिनांक 27 ते 31 पर्यंत आयोजीत करण्यात आला होता. यात महिलांनी महाआरती, गेम्स, नृत्य, स्पर्धा, प्रदर्शनी, नकला, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले यावेळी विविध कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षा व मार्गदर्शिका म्हणून ब्लड कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. विद्या बाल्लीकर, उद्घाटीका म्हणून मा. आमदार प्रतीभाताई धानोरकर, प्रमुख अतिथी म्हणून माधवी बदखल, तसेच ध.कु. विकास संस्था अध्यक्ष सौ. किरण संजय देरकर, सौ. साधना गोहोकार, शारदोत्सव समिती अध्यक्ष- सौ. मिनाक्षी देरकर, सत्कारमूर्ती व मार्गदर्शिका म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व तानाबाना संचालीका सौ. रजनी आत्राम, सौ. मोनाली गोवारदिये, सौ. साधना मत्ते उपस्थीत होत्या.
या कार्यक्रमामध्ये दररोज आगळ्या वेगळ्या अप्रतीम महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यात्मीक बौध्दीक सांस्कृतीक माध्यमातुन दररोज महिलांसाठी गेम्स, नृत्य, स्पर्धा, प्रदर्शनी, चर्चासत्र, फॅन्सी ड्रेस, नकला इत्यादी विवीध स्पर्धा व मार्गदर्शनाचे तसेच माँ जगदंबा जागरण या अप्रतिम अशा भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी या विविध कार्यक्रमात सहभाग घेतला.
ध. कु. समाज शारदोत्सव या कार्यक्रमासाठी समिती अध्यक्षा सौ. मिनाक्षीताई देरकर, लताताई वासेकर, संगीता खाडे, स्मिता नांदेकर, सविता गौरकार व ध.कु. विकास संस्थेच्या पदाधिकारी सौ. वंदना आवारी, सौ. अर्चना बोदाडकर, सौ. कविता चटकी, सौ. वनिता काकडे, सौ. रूपाली कातकडे, सौ. शारदा ठाकरे, सौ. संध्या बोबडे, ध.कु. विकास संस्था बिसी ग्रुप मधील सर्व सदस्या सखींनी तसेच समाजातील इतर सर्व जेष्ठ महीला व सखींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
0 Comments