यवतमाळ :- सुरज चाटे
जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत व अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेला प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्त पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 17/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ कडील पथक पो.स्टे. घाटंजी परिसरात अवैध धंदयाविरुध्द कारवाई करणे संबधाने पेट्रोलींग करीत असतांना पथकाला गोपणीय माहिती मिळाली की, पो.स्टे. घाटंजी हद्दीतील ग्राम साखरा येथील इसम नामे कैलास राठोड हा त्याचे साखरा ते पांढरकवडा रोडचे बाजुला असलेल्या शेताचे धुऱ्याजवळील विहीरीलगत हातभट्टी दारुची भट्टी लावुन दारु गाळत आहे. अशा माहिती वरुन शहानिशा केली असता माहिती प्रमाणे एक इसम शेतात एका पडक्या झोपडीजवळ ड्रमवर टोपले लावुन त्याखाली आग पेटवुन प्लास्टीक पाईपचे मदतीने एका प्लास्टीक डबकीत दारु गाळप करीत असतांना दिसला वरुन छापा कारवाई केली असता आरोपी नामे कैलास शिवलाल राठोड वय 43 वर्षे, रा. साखरा ता. घाटंजी हा मोक्यावर मिळुन आल्याने त्यांचे कब्जातुन गावठी दारु गाळण्या करीता उपयोगी येणारा मोहमाच सडवा, गावठी दारु व साहित्य असा एकुण 1,26,750 रु किमंतीचा मुद्देमाल जप्त केला असा असुन आरोपी विरुध्द पो.स्टे. घाटंजी येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, श्री. आधासिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, भोजराज करपते, नरेश राउत, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 Comments